शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

मराठा आरक्षणाचा खरे मारेकरी छगन भुजबळ, त्यांना फडणवीसांचे बळ: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 13:14 IST

दिलेला ‘शब्द’ पाळा, छगन भुजबळांचे ऐकाल तर २८८ पडतील; मनोज जरांगेंचा इशारा

नांदेड : मराठा आरक्षणाचा खरे मारेकरी छगन भुजबळ हे असून त्यांना बळ देण्याचे काम देवेंद्र फडणवीस हे करत आहेत. पडलेल्या ओबीसींची एक टोळी गोळा करायचे काम तुम्ही भुजबळांना सांगितले अन् त्यातून मराठा-ओबीसी दंगली घडविण्याचा तुमचा डाव कधीही यशस्वी होणार नाही. आजही वेळ गेली नाही, तुम्ही दिलेला ‘शब्द’ पाळा. मराठ्यांना आरक्षण द्या, हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेतील. पण, भुजबळांचे ऐकून दगाफटका केला तर २८८ पडतील, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला.

नांदेड येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी नांदेड येथे आयोजित मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीच्या समारोपप्रसंगी मनोज जरांगे बोलत हाेते. जरांगे पाटील म्हणाले, गाव-खेड्यातील मराठा आणि ओबीसी समाजात कधीही दुही निर्माण होणार नाही. परंतु, फडणवीस हे छगन भुजबळ यांना बळ देऊन पडलेल्या ओबीसी नेत्यांची एक टोळी जमा करत असून त्यांच्या माध्यमातून आंदोलने उभी करणं, गावागावात ओबीसी-मराठा दंगली घडवणं, असे डाव आखत आहेत. पण, ग्रामीण भागातील मराठा, ओबीसी हे सगळं ओळखून आहेत. त्यामुळे आमचं हे शांततेचं युद्ध शांततेनंच सुरू राहील आणि ते कुणालाच पेलणार नाही, असेही जरांगे म्हणाले.

याच मराठ्यांनी तुम्हाला १०६ आमदार दिले, हे तुम्ही विसरलातफडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांचा द्वेष करू नका, आम्ही तुम्हाला कधीच विरोधक मानलं नाही की शत्रू. तुम्ही सरकारमध्ये आहात म्हणून तुमच्याकडून अपेक्षा आहेत. तुम्ही सांगता, १९८० पासून ज्यांनी काहीच दिलं नाही हे आम्हाला पण माहीत आहे. तेच ते किती दिवस सांगणार, त्यांनी चूक केली ती तुम्ही दुरूस्त करा. तुम्ही १३ टक्के आरक्षण दिले तेव्हा तुम्हाला १०६ आमदार याच मराठ्यांनी दिले, हे तुम्ही विसरत आहात. आजही वेळ गेली नाही, वेळीच निर्णय घ्या. छगन भुजबळ यांचे ऐकाल तर महाराष्ट्रातून संपूर्ण भाजप संपेल एवढं लक्षात ठेवा, असा इशारा जरांगे यांनी दिला.

चंद्रकांतदादांना अधिसूचना वाचायला सांगासगे-साेयरे अन् नातेवाईक यांच्यातील फरक चंद्रकांतदादा पाटील यांना माहीत नाही. त्यामुळे त्यांना एकदा अधिसूचना वाचायला सांगा, असे आवाहनदेखील जरांगे यांनी केले. तसेच चंद्रकांतदादा, गिरीष महाजन, छगन भुजबळ यांना वेळीच आवर घाला. त्यांना आमच्या अंगावर घालण्याचे काम करू नका, हे कोण करतंय ते आम्हाला कळतंय, असे सांगत त्यांनी फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणNandedनांदेड