शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कमी पैशात धान्य देण्याच्या आमिषाने ९ हजार महिलांची फसवणूक; तेराशे महिलांच्या तक्रारी

By प्रसाद आर्वीकर | Updated: October 10, 2023 18:28 IST

या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अन्नधान्यही जप्त केले आहे. त्यामध्ये १९७ पोती तांदूळ, ४३ पोती गहू, ६ पोती साखर, ३० पोती पोहे, तेलाचे पॉकेट, वॉशिंग पावडरची दोन पोती आदींचा समावेश आहे.

शेखर पाटीलमुखेड : मुखेडसह कंधार, नायगाव, बिलोली या तालुक्यांतील तब्बल ९ हजार महिलांना कमी पैशात धान्य पुरवठा करतो, असे सांगून गंडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणामध्ये तेराशे महिलांनी पोलिस ठाण्यामध्ये तक्रारी केल्या आहेत. मात्र, पोलिसांचा तपास अजूनही संथ गतीने सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य अन्नदाता सुविधा केंद्र मुखेड यांच्या वतीने फक्त महिलांसाठी योजना असल्याचे सांगून महिला एजंटांच्या माध्यमातून हजारो महिलांचे आधार कार्ड, पासपोर्ट फोटो जमा करण्यात आले. २१०० रुपये आणि २३५० रुपयांप्रमाणे रक्कमही जमा करण्यात आली. यातील काही महिलांना धान्य पुरवठा केला. तर अनेक महिलांना धान्य पुरवठा करण्यात आला नाही. मुखेड पोलिस ठाण्यात या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी राजकुमार घोडके यास अटक केली आहे. त्याला १० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती; परंतु पोलिस कोठडीत पोलिसांना कोणताही पुरावा हाती लागला नाही. या गैरव्यवहारात श्री गोविंदराज ग्रामीण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कोणाची आहे? व अन्य आरोपी कोण आहेत? हे धर्मादाय कार्यालयातून आल्यानंतर आम्ही तपास करणार, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. 

या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अन्नधान्यही जप्त केले आहे. त्यामध्ये १९७ पोती तांदूळ, ४३ पोती गहू, ६ पोती साखर, ३० पोती पोहे, तेलाचे पॉकेट, वॉशिंग पावडरची दोन पोती आदींचा समावेश आहे. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी रेशनकिट पावत्या पोलिस ठाण्यामध्ये जमा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर सुमारे १३०० महिलांनी रक्कम भरलेल्या पावत्या पोलिस ठाण्यामध्ये जमा केल्या आहेत.कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या या केंद्र चालकाने एवढा अन्नधान्याचा साठा कोठून खरेदी केला? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तहसील कार्यालयाची चुप्पीअन्नधान्याचे किट घेण्यासाठी महिलांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहेत. एवढा मोठा अन्नधान्य साठा आणला कुठून याची साधी चौकशी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने केली असती तर आज ही फसवणूक झाली नसती. सध्या तरी पुरवठा विभागाची हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडfraudधोकेबाजी