शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त मद्यामुळे मद्यपींचे ‘थर्टीफर्स्ट’ तेलंगणात, महाराष्ट्राच्या तुलनेत ४० टक्क्यांनी कमी दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 18:45 IST

जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यात देशी दारूचे दर महाराष्ट्रापेक्षा ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याने महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील परमिट रुम थंडावले आहेत़ दरम्यान, काल थर्टीफर्स्ट असतानाही असंख्य परमिट रुम ओस पडले होते़ 

ठळक मुद्देनांदेड जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यात देशी दारूचे दर महाराष्ट्रापेक्षा ४० टक्क्यांनी स्वस्तत्या भागातील परमिट रुम सकाळी ११ वाजेपासून हाऊसफुल्ल झाले़ तर पहाटे ५ वाजेपर्यंत परमिट रुम चालू ठेवण्यासाठी तेथील सरकारने परवानगी दिली होती़

बिलोली (नांदेड) : नांदेड जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यात देशी दारूचे दर महाराष्ट्रापेक्षा ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याने महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील परमिट रुम थंडावले आहेत़ दरम्यान, काल थर्टीफर्स्ट असतानाही असंख्य परमिट रुम ओस पडले होते़ 

मद्यपी शौकिनांनी थर्टीफर्स्ट तेलंगणा राज्यात जावून साजरा केला़ तर अनेकांनी पार्सल आणून पार्टी केली़ थर्टीफर्स्टला रविवार आल्याने तेलंगणाच्या शहरातील परमिट रुम सकाळपासूनच गर्दीने फुलून गेले़  नवीन झालेले तेलंगणा हे २७ वे राज्य असून नांदेड जिल्ह्यालगत आहे.  बिलोली, धर्माबाद, भोकर, देगलूर, किनवट या पाच तालुक्यांशी अगदी जवळ सीमा आहे़ त्यामुळे या भागातून दळणवळण व्यवस्थाही सातत्याने होते़ ३१ तारखेला रविवार आला़ त्यामुळे सामान्य नागरिकांना थर्टीफर्स्ट एन्जॉय करण्यासाठी कोणतीही अडचण आली नाही; पण विदेशी दारूच्या संदर्भात वेगळेच चित्र पाहण्यास मिळाले़ वर्षाचा शेवटचा दिवस, दरवर्षी होणारी चांगले गि-हाईक पाहता परमिट रुमचालकांनी रोषणाई करून दुकाने सजवले़, परंतु त्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले़ एकूणच लगतच्या तेलंगणात विदेशी दारूच्या दरात ४० ते ४५ टक्क्यांची तफावत असल्याचे पुढे आले़ परिणामी चारचौघे शौकीन एकत्र आले की लहान-सहान वाहन  घेवून त्या राज्यात जावून थर्टीफर्स्ट एन्जॉय केला़ मित्र परिवार एकत्रित येवून होणार्‍या खर्चात आर्थिक बचत झाल्याने शौकिनांनी सकाळपासूनच तेलंगणाची वाट धरली़ 

एक तर कमी प्रवास व स्वस्ताची दारू, त्यामुळे त्या भागातील परमिट रुम सकाळी ११ वाजेपासून हाऊसफुल्ल झाले़ तर पहाटे ५ वाजेपर्यंत परमिट रुम चालू ठेवण्यासाठी तेथील सरकारने परवानगी दिली होती़ दरातील मोठी तफावत पाहता थर्टीफर्स्ट असूनही रात्री उशिरा चालू राहणारे या भागातील परमिट रुम दहा वाजताच सामसूम झाले. अवघ्या दहा कि़मी़ अंतरावरील तेलंगणा राज्यात विदेशी दारूच्या दरात तब्बल ४० ते ५० टक्के तफावत झाल्याने परमिटरूमचालक अडचणीत आले़ 

तेलंगणात परमिट रुम परवान्याचा होतो लिलावदराच्या संदर्भात तेलंगणा राज्यातील राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांकडून माहिती घेतली असता ते म्हणाले, तेलंगणात परमिट रुम आणि वाईन शॉपच्या परवान्याचा स्पर्धात्मक लिलाव होतो व विक्रीचा परवाना दिला जातो़ त्याचप्रमाणे वेगवेगळ्या दारू कंपनीच्या कारखान्यातून थेट परवानाधारकांना उत्पादित दारू पुरविली जाते़ परवाना लिलाव पद्धतीमुळे शासनाच्या महसूलमध्ये प्रचंड वाढ होते़ दारूवरील कर लावण्याचे धोरण वेगळी पद्धती असून परवाना नूतनीकरणही सप्टेंबर अखेरपर्यंत होते़ परवानाधारकांच्या स्पर्धात्मक लिलाव पद्धतीमुळे ठरावीक महसूल पेक्षाही जास्तीचा महसूल शासनाला मिळतो़ पण कर कमी असल्यामुळे छापील दरात दारूची विक्री होते़ दारू उत्पादक ते परवानाधारक यामध्ये ठोक परवानाधारकाची पद्धत नसल्याने दरात मोठी तफावत येते़.

टॅग्स :New Year 2018नववर्ष २०१८Nandedनांदेड