शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या परीक्षार्थींना खुर्ची दिली पण डेस्क गायब, पहिल्याच पेपरला नियोजनाचा फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 18:38 IST

देगलूरच्या धुंडा महाराज महाविद्यालयातील प्रकार.

- शब्बीर शेखदेगलूर:  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या बारावीच्या परीक्षांना बुधवारपासून सुरुवात झाली. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता शिक्षण मंडळाने योग्य ती तयारी करून घेणे अपेक्षित होते.मात्र शिक्षण मंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे परीक्षार्थींना डेस्कच उपलब्ध नसल्याने चक्क खुर्चीवर बसूनच परीक्षा द्यावी लागल्याचा प्रकार शहरातील धुंडा महाराज महाविद्यालयात घडला आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांसह पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

तालुक्यातील आश्रम शाळा शिळवणी तांडा, इंदिराबाई देशमुख महाविद्यालय हणेगाव,श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज मरखेल तसेच शहरातील देगलूर महाविद्यालय , धुंडा महाराज महाविद्यालय, व मानव्य विकास विद्यालय अशा सहा ठिकाणी एकूण 2451 विद्यार्थी बारावीच्या परीक्षा देत आहेत. त्यापैकी शहरात असलेल्या धुंडा महाराज महाविद्यालय येथे 324 विद्यार्थी परीक्षा देत असताना मात्र या महाविद्यालयात 220 डेस्कच उपलब्ध असल्याने उर्वरित परीक्षार्थींना डिस्कविनाच फक्त खुर्चीवर बसूनच पेपर लिहिण्याची नामुष्की ओढवली आहे.  विशेष म्हणजे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता तालुक्यातील शिक्षण मंडळाने योग्य ती तयारी करून घेणे अपेक्षित होते. याकडे डोळे झाक केल्याने परीक्षार्थी यांच्यावर आजचा प्रसंग ओढवला आहे. यामुळे तालुक्यातील शिक्षण विभागाचा नियोजन शून्य कारभार पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आला आहे. याप्रकरणी अधिकची माहिती घेण्यासाठी परीक्षा प्रमुख तथा गटशिक्षणाधिकारी तोटरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

अभिप्राय नोंदवला आहे आज सकाळी परीक्षेदरम्यान धुंडा महाराज महाविद्यालयास भेट दिली असता हा प्रकार माझ्याही निदर्शनास आला आहे. याप्रकरणी मी माझा अभिप्राय नोंदविला असून सोबतच हा संपूर्ण प्रकार नांदेडचे शिक्षणाधिकारी यांच्याही कानावर घातले आहे.- राजाभाऊ कदम, तहसीलदार,देगलूर

योग्य ती काळजी घ्यावी खुर्चीवर पेपर लिहिताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याप्रकरणी शिक्षण विभागाने वेळीच लक्ष देऊन विद्यार्थ्यांना होणारा त्रास थांबवावा.- धनाजी जोशी, शिवसेना, शहर संघटक (शिंदे गट)

टॅग्स :NandedनांदेडHSC / 12th Exam12वी परीक्षाexamपरीक्षा