शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

बाराही महिने फुलशेतीतून मिळविले रोखीने उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 12:10 IST

यशकथा : अर्धापूर  तालुक्यातील पार्डी येथील फुलशेतीमधून शेतकरी वर्षाला लाखो रुपयांचे उत्पादन मिळवीत आहेत़ 

- युनूस नदाफ (पार्डी जि. नांदेड)

अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील शेतकरी मागील चार वर्षांपासून फुलशेती करून हमखास रोखीचे उत्पन्न मिळवीत आहेत़ वर्षातील बाराही महिने फुलशेती करून आपला उदरनिर्वाह भागवीत आहेत़ फुलशेतीमधून शेतकरी वर्षाला लाखो रुपयांचे उत्पादन मिळवीत आहेत़ 

तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाळा कमी होत चालल्याने शेतीतील वार्षिक उत्पन्न कमी होत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येत राहिले़ शेतकरी मोठ्या प्रमाणावर नगदी पिकाकडे वळत आहेत़ हा तालुका केळी, हळद, सोयाबीनसाठी प्रसिद्ध असून, केळी पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते; परंतु गेल्या काही वर्षांपासून पावसाळा कमी होत असल्याने केळीचे उत्पादन कमी झाले, तसेच या वर्षात दुष्काळ परिस्थितीतून केळीला वाचविले; परंतु भाव कमी मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़ त्यामुळे मागील चार वर्षांपासून शेतकरी फुलशेतीकडे वळत आहेत़

येथील शेतकरी इतर पिकांबरोबरच फुलशेती करीत आहेत़ यामुळे रोजच्या रोज शेतकऱ्यांना रोखीचे पैसे मिळत आहेत़ येथे मोठ्या प्रमाणावर गुलाब, झेंडू व मोगरा या जातीच्या फुलांची लागवड करण्यात येत आहे़ येथील शेतकरी माधवराव कवडे यांच्या शेतात बाराही महिने फुले असतात़ त्यांनी या वर्षात एक एकरमध्ये झेंडू, गुलाब फुलांची लागवड केली आहे़ यासाठी त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च केला आहे़ त्यांचा मुलगा दररोज फुले घेऊन शहरातील फुलबाजारामध्ये फुलांची विक्री करतात़ येथे त्याच्या फुलाला भरपूर भाव मिळतो़ यातून सर्व खर्च जाऊन त्यांना १,५०० ते २,०००  रुपये मिळतात़

माधवराव कवडे यांच्याकडे सहा एकर जमीन असून, त्यांनी वीस गुंठ्यात गुलाब, नेटसेटमध्ये तीस गुंठे गुलाब व एक एकरमध्ये झेंडू लागवड केली आहे़ त्यासाठी त्यांना तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आला असून, दररोज १,५०० ते २,००० रुपये उत्पन्न होत आहे़ त्यांनी आपल्या शेतात फुलशेतीसाठी सिंगल फेजची जोडणी केली़ कारण की थ्री फेजची लाईट ८ तास मिळते़ त्यामुळे त्यांनी पन्नास हजार रुपये खर्च करून सिंगल फेजची जोडणी केली आहे़ त्याचबरोबर फुलशेतीत ठिबक सिंचनाने पाणी देण्यात येते़ त्यामुळे पाण्याची व वेळेची बचत होत आहे़ उन्हाळ्यात व हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर फुलांना पाणी लागते़ त्यामुळे ठिबक संचाचा वापर करण्यात आले आहे़ 

मी गेल्या चार वर्षांपासून फुलशेती करीत आहे़ मला फुलापासून चांगले उत्पन्न मिळत आहे़ त्यामुळे केळी व हळद हे पिके कमी केली आहेत़ उन्हाळ्यात फुलांची मागणी जास्त असते़ त्यामुळे भरपूर पैसा मिळतो, असे शेतकरी माधवराव कवडे यांनी सांगितले. नापिकीला आत्महत्येचा पर्याय असू शकत नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी