शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तोडणीसाठी शेतात जाता येईना; सततच्या पावसामुळे मूग, उडीद हातचे गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 19:54 IST

मागील सात, आठ दिवसापासून जिल्ह्यात कुठे रिपरिप तर कुठे दमदार पाऊस होत आहे़ या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले मूग व उदीडाचे पीक वाया गेले आहे़

ठळक मुद्देजिल्ह्यात ५० हजार हेक्टरवर मूग, उडीदाचा पेरासततच्या पावसाने तोडणीचे काम थांबले

नांदेड : मागील सात, आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने  काढणीला आलेल्या मुगाचे ५० टक्के नुकसान केले असून सोयाबीनचे पीकही पिवळे पडले आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे़ 

सध्या मूग काढणीला आला आहे़ मात्र याच वेळेला पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे मूग तोडणीसाठी मजुरांना शेतात जात येत नाही़ मागील सात, आठ दिवसापासून जिल्ह्यात कुठे रिपरिप तर कुठे दमदार पाऊस होत आहे़ या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले मूग व उदीडाचे पीक वाया गेले आहे़ तर सोयाबीनचे पीकही पिवळे पडत चालले आहे़  

जिल्ह्यात हिमायतनगर, किनवट, भोकर, माहूर या तालुक्यातील नद्या, नाल्यांना पूर आला असून काही  गावांचा संपर्क तुटला आहे़ या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोेठ्या प्रमाणात नुकसान केले आहे़ सुरूवातीला झालेल्या पोषक पावसामुळे यंदा मुग, सोयाबीनचे पिके जोमात आली होती़ मुगाच्या शेंगा काढणीला आल्या होत्या़ मात्र ऐन वेळेला पावसाने हजेरी लावल्याने मुगाच्या शेंगा काढण्यास वेळच मिळाला नाही़  यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली होती़ मात्र आता मूग, उडीद व सोयाबीन हे  पिके  हातची गेले आहेत़ सर्वाधिक नुकसान मुगाच्या पिकाचे झाले असून काढणीला आलेल्या शेंगा वाळल्या असून त्यातून आता मोड बाहेर येत आहेत़ त्यामुळे मुगाचे पीक पुर्णत: हातचे गेले आहे़ उडीदाच्याशेंगा  परिपक्व नसल्याने त्या काढणीला आल्या नाहीत़ दरम्यान, बुधवारी दिवसभर उघडीप दिल्यानंतर गुरूवारी पुन्हा सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली़ हवामान विभागाने पुढील पाच दिवस पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे़ त्यामुळे आता उरलेल्या मूगाचे पीकही हातचे जाणार आहे़  नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़ 

मूग तोडणीसाठी मजुरांना शेतात जाता येईनाजिल्ह्यात यंदा जवळपास ५० हजार हेक्टरवर मूग आणि उडीदाचा पेरा झाला आहे़ सुरूवातीला या पिकांना पोषक पाऊस झाल्याने मूग, उडीदाचे पिक बहरले होते़ सध्या मूग काढणीला आला असून सततच्या पावसाने मूग तोडणीसाठी मजुरांना शेतात जात येत नाही़ त्यामुळे मूग तोडणी लांबली आहे़ मुगास यंदा प्रति हेक्टरी पाच ते सात क्विंटलचा उतारा येत आहे़ उडीदाच्या शेंगा परिपक्व झाल्या असल्या तरी काढणीस आल्या नाहीत़ त्यामुळे उडीदाचे फारसे नुकसान झाले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत़ मात्र मुगाच्या शेंगा वाळल्या असून सततच्या पावसाने शेंगातून मोड बाहेर येत आहेत़ त्यामुळे मूगाचे पिक शेतकऱ्यांच्या हातून गेल्याचे चित्र असून, पाऊस असाच राहिल्यास सोयाबीनलाही धोका होण्याची भिती व्यक्त केली जात आहे़

२६ हजार हेक्टरवर पेरणीमागील वर्षीचा अनुभव लक्षात घेवून शेतकऱ्यांनी यंदा कापसाऐवजी सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर केला आहे़ तर  मूगाची २६ हजार हेक्टरवर पेरणी केली होती़ ऐन मूग काढणीला सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केल्याचे पिंपरी महिपाल येथील शेतकरी नागोराव चंदेल यांनी सांगितले़  

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसFarmerशेतकरी