शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

वाळूघाटावरील छावण्या उरल्या नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:19 IST

जिल्ह्यात महसूल प्रशासनाने १२ वाळू घाटांना मंजुरी दिली आहे़ या घाटावरुन बेसुमार वाळू उपसा होवू नये यासाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली होती़ तसेच प्रत्येक घाटावर एक छावणी उभारण्यात आली होती़ परंतु रात्रीच्या वेळी या छावणीसमोरुनच मोठ्या प्रमाणात वाळूचे ट्रक बिनदिक्कतपणे जात आहेत़

ठळक मुद्देरात्री बेसुमार उपसाकौठा, असर्जन भागातील रस्त्यावर रात्री वाहनांच्या रांगा

नांदेड : जिल्ह्यात महसूल प्रशासनाने १२ वाळू घाटांना मंजुरी दिली आहे़ या घाटावरुन बेसुमार वाळू उपसा होवू नये यासाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली होती़ तसेच प्रत्येक घाटावर एक छावणी उभारण्यात आली होती़ परंतु रात्रीच्या वेळी या छावणीसमोरुनच मोठ्या प्रमाणात वाळूचे ट्रक बिनदिक्कतपणे जात आहेत़ नांदेड शहरानजीक भनगी, कौठा, असर्जन या भागात रात्रभर वाळू उपसा करण्यात येत आहे़जिल्ह्यात नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असून त्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास होत आहे़ परवानगी नसतानाही अनेक घाटांवरुन अनधिकृतपणे वाळूचा उपसा करण्यात येत आहे़ त्यासाठी महसूलमधील काही जणांचे वाळू माफीयांशी लागेबांधे असण्याची दाट शक्यता आहे़ मध्यंतरी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी वाळूमाफियांवर कारवाई केली होती़ त्यानंतर वाळू उपसा रोखण्यासाठी विशेष पथकांची स्थापना केली होती़ परंतु ही विशेष पथके नावालाच असल्याचे आतापर्यंत त्यांनी केलेल्या कामगिरीवरुन दिसून येते़ त्यात वाळू घाटावर उभारण्यात आलेल्या छावण्यांचा वाळू उपशावर किती परिणाम झाला हाही संशोधनाचा विषय आहे़ छावण्या असतानाही रात्रभर वाळू उपसा करण्यात येत आहे़ नांदेड तालुक्यात रात्रीच्या वेळी तराफ्यावरुन वाळू काढण्यात येत आहे़ जवळपास एक ब्रास वाळूसाठी सध्या ३५०० ते ३७०० रुपये मोजावे लागत आहेत़ एका रात्रीत या भागातून जवळपास १०० ब्रास वाळू उपसा करण्यात येत आहे़ रात्री कौठा भागात वाळू घेवून जाणाऱ्या वाहनांची रांग दिसून येते़चौकात खबरे तैनातवाळू माफियांवर कारवाईसाठी प्रशासनाने पथके तयार केली़परंतु या पथकांना वाळू माफिया सहज चुकारा देत आहेत़ मुख्य चौकात वाळू माफिया आपले खबरे रात्रभर बसवितात़ महसूल किंवा पोलिसांची गाडी घाटाकडे जाणा-या रस्त्यावर चालल्याचा अंदाज येताच फोनवरुन घाटावरील सर्व वाहनधारकांना सतर्क केले जाते़ काही वेळातच ही वाहने दुस-या मार्गाला नेण्यात येतात़

टॅग्स :NandedनांदेडsandवाळूNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड