शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमधील अनधिकृत नळाविरुद्ध मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:29 IST

शहरातील अनधिकृत नळ जोडणीविरुद्ध महापालिकेने मंगळवारपासून मोहीम हाती घेतली असून मंगळवारी शहरातील नांदेड-देगलूर रस्त्यावर अनधिकृत नळजोडणीद्वारे चक्क सर्व्हीसिंग सेंटर चालविले जात होते. या सर्व्हीसिंग सेंटरला महापालिकेने सील ठोकले आहे.

ठळक मुद्देरेल्वेस्थानक परिसरात नळजोडणीवर चक्क सर्व्हीसिंग सेंटर

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील अनधिकृत नळ जोडणीविरुद्ध महापालिकेने मंगळवारपासून मोहीम हाती घेतली असून मंगळवारी शहरातील नांदेड-देगलूर रस्त्यावर अनधिकृत नळजोडणीद्वारे चक्क सर्व्हीसिंग सेंटर चालविले जात होते. या सर्व्हीसिंग सेंटरला महापालिकेने सील ठोकले आहे.शहरात एक लाखाहून अधिक मालमत्ता असताना ५४ हजार नळ कनेक्शन आहेत. प्रत्यक्षात ही संख्या मोठी आहे. त्यामुळे ५४ हजार अधिकृत नळ कनेक्शनव्यतिरिक्त असलेले अनधिकृत कनेक्शनचा शोध घेण्याचे आदेश आयुक्त लहुराज माळी यांनी दिले. या आदेशानुसार महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, कार्यालय अधीक्षक राजेश चव्हाण, कनिष्ठ अभियंता संदीप पाटील, अनिल जोशी, फेरोज खान, प्रभाकर कल्याणकर तसेच सहकाऱ्यांनी रेल्वेस्टेशन ते देगलूर नाका या भागातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेत अनधिकृत नळ कनेक्शन घेवून चक्क मोटार सर्व्हीसिंग सेंटर चालवले जात होते. सरदार मेजरसिंघ हिरासिंघ यांच्या मालमत्तेमध्ये हे सेंटर सुरू होते. त्या सेंटरला महापालिकेने सील ठोकले आहे. हे सर्व्हीसिंग सेंटर पाच महिन्यांपासून सुरू असल्याचे घरमालकाने सांगितले. प्रत्यक्षात ते किती दिवसांपासून सुरू होते याचा महापालिकेकडून शोध घेतला जात आहे.शहरात अनधिकृत नळकनेक्शन विरुद्ध मोहीम तीव्र केली जाणार असल्याचे आयुक्त माळी यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही अनेकदा अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी महापालिकेकडून मोहीम राबविण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात मोहिमेला प्रारंभ झालाच नव्हता. मंगळवारी मात्र प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात झाली. बुधवारपासून शहरातील अन्य भागातही अनधिकृत नळ जोडणीचा शोध घेतला जाणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले.---मुख्य जलवाहिनीवरुनच अनधिकृत कनेक्शनमहापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा करण्यासाठी रेल्वेस्टेशन ते देगलूरनाका या भागात मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या मुख्य जलवाहिनीला फोडूनच अनधिकृत नळ कनेक्शन घेण्यात आले आहेत. याबाबत महापालिकेकडे माहिती मिळाल्यानंतर कारवाई हाती घेण्यात आली आहे. एकीकडे पाणी नियमित करण्याची मागणी होत असताना मनपाने आता अनधिकृत नळधारकांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे.

टॅग्स :NandedनांदेडMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणी