शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
5
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
6
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
7
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
8
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
9
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
10
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
11
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
12
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
13
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
14
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
15
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
16
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
17
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
19
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
20
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक

अनैतिक संबंधातून क्रूर हत्या! दारूच्या नशेतील पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने नदीत फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:06 IST

किनवटमधील थरार! पत्नीचे 'अनैतिक प्रेम' ठरले पतीचा 'काळ'; ब्रोकर प्रियकर आणि पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

किनवट (नांदेड): प्रेम आणि नात्यावरचा विश्वास उडवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच आपल्या प्रियकरासोबत मिळून कट रचला आणि दारूच्या नशेत असलेल्या पतीला थेट पैनगंगा नदीच्या पुलावरून खाली फेकून दिले. तब्बल दीड महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर किनवट पोलिसांनी या खुनाच्या प्रकरणाचा यशस्वीपणे छडा लावला आहे, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?विनोद किशन भगत (वय ५१, मूळ रा. सिंदगी मो., वास्तव्यास गोकुंदा) यांचा संसार सुरू असतानाच त्यांची पत्नी प्रियंका हिचे किनवट शहरातील ब्रोकरचे काम करणाऱ्या शेख रफीक याच्यासोबत अनैतिक संबंध जुळले होते. पती विनोद भगत हे या संबंधात अडथळा ठरत असल्याने, पत्नी प्रियंका आणि प्रियकर शेख रफीक यांनी संगनमत करून त्यांना संपवण्याचा क्रूर कट रचला.

खुनाची थरारक रात्र आणि फसवणुकीची फिर्याद२९ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी, दारूच्या नशेत असलेल्या विनोद भगत यांना घेऊन दोघेही मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील खरबी पुलावर गेले. तिथे त्यांनी विनोद भगत यांना पुलावरून जिवंत खाली फेकून दिले. या क्रूर हत्येनंतर चारच दिवसांनी, म्हणजेच ३ सप्टेंबर २०२५ रोजी मयताची पत्नी प्रियंका हिने स्वतः किनवट पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची (मिसींग) तक्रार दाखल केली. मात्र, मयताच्या बहिणींनी भावाचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला, आणि हाच धागा किनवट पोलिसांना सत्य उघड करण्यासाठी महत्त्वाचा ठरला.

पोलिसांनी उलगडले रहस्यजिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान, फिर्यादी असलेल्या पत्नीच्या मोबाईलमधील एका विशिष्ट क्रमांकावर (प्रियकर शेख रफीक) वारंवार झालेले कॉल पोलिसांना संशयास्पद वाटले. त्या क्रमांकाच्या व्यक्तीला (प्रियकर शेख रफीक) ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली आणि खुनाचे भयावह सत्य उघड झाले.

पत्नी आणि प्रियकर ताब्यातपोलिसांनी तांब्याची अंगठी आणि कपड्यांवरून २ सप्टेंबर रोजी पोफळी शिवारात (विदर्भ, महागाव तालुका) सापडलेल्या प्रेताची ओळख पटवली. यानंतर, किनवट पोलिसांनी प्रियकर शेख रफीक आणि खुनी पत्नी प्रियंका या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. ज्या नात्यावर विश्वास ठेवावा, त्याच नात्याने दगा दिला! अनैतिक संबंधापायी एका व्यक्तीचा जीव गेला आणि त्याचे कुटुंब विस्कटले, या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्हा हळहळ व्यक्त करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Wife and Lover Kill Husband, Throw Body in River!

Web Summary : In Nanded, a wife and her lover murdered her husband, hindered their affair, by throwing him off a bridge into a river. Police investigations revealed the crime after the wife filed a missing person report, leading to their arrest.
टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी