शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

स्वारातीमला उत्कृष्ट शंभर विद्यापीठात आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:36 IST

सर्व शाखातील समतोल अभ्यासक्रम तयार करण्याबरोबर महाविद्यालयास स्वायत्तता देण्याचाही विचार असल्याचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी सांगितले. स्वारातीम विद्यापीठाला देशातील शंभर उत्कृष्ट विद्यापीठात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, विद्यापिठाअंतर्गतच्या सक्षम महाविद्यालयास स्वायत्तता देण्याचाही विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देकुलगुरू भोसले एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये झाला हृद्य सत्कार

नांदेड : सर्व शाखातील समतोल अभ्यासक्रम तयार करण्याबरोबर महाविद्यालयास स्वायत्तता देण्याचाही विचार असल्याचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी सांगितले. स्वारातीम विद्यापीठाला देशातील शंभर उत्कृष्ट विद्यापीठात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, विद्यापिठाअंतर्गतच्या सक्षम महाविद्यालयास स्वायत्तता देण्याचाही विचार असल्याचे त्यांनी सांगितले.शहरातील एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वारातीम विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांचा एमजीएम संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयाच्या संचालीका डॉ. गीता लाठकर, प्राचार्य डॉ.शिरीष कोटगीरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. विद्यापीठ कार्यक्षेत्रात अत्यंत कमी महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन झाले आहे. पुढील एक ते दिड वर्षात यामध्ये वाढ व्हावी या दृष्टीने प्रयत्न तसेच पाठपुरावा करणार असल्याचे सांगत, मराठवाड्यात शिक्षणाचे रोपटे लावणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थाच्या नावाने स्थापन झालेल्या विद्यापीठाचा कुलगुरू होण्याचा मान मिळाल्याबद्दल कमलकिशोर कदम यांनी कुलगुरूंचा सन्मान केला. डॉ. भोसले यांनी गुणवत्ता असूनही विनय सोडला नाही, जिथे गेले तिथे त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटविल्याबद्दल गौरवोद्गार काढत, सहका-यांना सोबत घेवून उत्कृष्ट प्रतिचे काम करण्यात ते आजवर यशस्वी झाले आहेत. मराठवाड्याचा माणूस पुढील काळात मुंबई-पुणे विद्यापीठाचा कुलगुरू व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करीत, पुढील प्रवासात देशातील नामांकित विद्यापीठाचे नेतृत्त्व करण्याच्या शुभेच्छाही कमलकिशोर कदम यांनी कुलगुरूंना भोसले यांना दिल्या.यावेळी ग्रंथपाल डॉ. गोविंद हंबर्डे यांनी कुलगुरूंच्या शैक्षणिक कार्याची ओळख करून दिली. डॉ.गीता लाठकर यांनी प्रास्ताविकात डॉ.उद्धव भोसले यांच्या एमजीएममधील उत्कृष्ट शिक्षक असल्याच्या अनेक आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाला विभाग प्रमुख डॉ.अर्चना राजुरकर, डॉ.दीपक पत्तेवार, डॉ.जसबिरसिंग सिद्धू, डॉ.कल्पना जोंधळे, प्रो.एच.ए.हाश्मी, रिमोट सेंटर समन्वयक प्रा.ज्योती पाटील, प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रमुख प्रा.नारायण कदम, टीपीओ शिवप्रसाद तितरे, आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडEducationशिक्षण