शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

'माझी बायको परत आणून द्या', मद्यपी मुलाच्या मारहाणीत पित्याचा मृत्यू, आई गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 19:07 IST

Drunken son killed father : आई गंभीर जखमी असून त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हदगाव (नांदेड): 'माझी सोडून गेलेली पत्नी आणून द्या', म्हणत दारुच्या नशेत मुलानेच वृद्ध आईवडिलांना जबर मारहाण केली (Drunken son killed father ) . यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी आहे. ही घटना तालुक्यातील तळणी येथे सोमवारी संध्याकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान घडली. माधव परसराम गंगाळे (६५) असे मृताचे नाव आहे.

तालुक्यातील तळणी येथे माधव गंगाळे हे पत्नी गीताबाई यांच्यासह मजूरी करुन उपजीविका करतात. माधव हे गावातील एका पिठाच्या गिरणीवर काम करतात. त्यांना दोन मुले आहेत. एक मुंबईला काम करतो तर दुसरा संजय (४०) हा गावातच मजुरी करतो. तीन अपत्य असलेल्या संजयची पत्नी तीन महिन्यांपूर्वी त्रासाला कंटाळून मुलांसह घरातून पळून गेली. 

याच्या रागातून संजयने सोमवारी दारू प्राशन करून आई वडिलांसोबत वाद घातले. माझी बायको सोडून गेली यास तुम्हीच कारणीभूत आहात, तिला आणून द्या नाही तर तुमचा जीव घेतो , असे म्हणत संजयने त्यांना मारहाण  केली. यात वडील माधव गंगाळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी असून त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोपी मुलगा संजयला पोलिसांनी अटक केली आहे. हदगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोरे व पोलिस पाटील उद्धव पाटील यांनी पंचनामा केला.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीNandedनांदेड