शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वरून माशांचे तर त्याखाली गुटख्याचे बॉक्स; पोलीस कारवाईत गुटख्याचा मोठा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 20:50 IST

कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात विविध मार्गाने  नवनवीन शक्कल लढवून गुटख्याची तस्करी केली जाते.

ठळक मुद्दे माशांच्या बॉक्सच्या खाली प्रतिबंधित असलेल्या नामांकित कंपनीचा गुटखा आढळून आला.

मरखेल (जि. नांदेड) : वरून माशांचे बॉक्स व त्याखाली गुटख्याचे बॉक्स घेऊन जाणारे चारचाकी वाहन हणेगावहून देगलूरच्या दिशेने निघाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी पाळत ठेवून हे वाहन पकडले असता, त्यात माशांच्या बॉक्सच्या खाली प्रतिबंधित असलेल्या नामांकित कंपनीचा गुटखा आढळून आला. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी या वाहनासह (एम़एच़२६-बी़ई़५६१०) त्यातील दोघांना ताब्यात घेऊन  त्यांच्याविरुद्ध मरखेल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविला. ही घटना मंगळवारी सायंकाळी  घडली. यात १ लाख ९४ हजार ३६० रुपयांचा गुटखा व चार लाख रुपये किमतीची व्हॅन असा एकूण ५ लाख ९४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सदर वाहन पोलीस ठाण्यामध्ये लावण्यात आले. 

कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात विविध मार्गाने  नवनवीन शक्कल लढवून गुटख्याची तस्करी केली जाते. किराणा सामान व भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांतून मोठ्या प्रमाणात गुटखा वितरित केला जात होता. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत चालक मधुकर रमण मुधोळकर (रा.शांतीनगर, इतवारा नांदेड ) व मालक वहाज शेख सिराज (रा.पूर्णा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून दोघांनाही ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडPoliceपोलिस