शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुरूद्वारा बोर्डावरील शासन नियुक्त सदस्यांच्या संख्येत वाढ केल्याच्या निषेधार्त नांदेडमध्ये शीख समाजाकडून काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 15:51 IST

श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डावर शासन नियुक्त सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याच्या निर्णयास नांदेडमध्ये शीख समाजाकडून विरोध करण्यात आला आहे़ या निर्णयाच्या विरोधात आज काळा दिवस पाळण्यात आला़

नांदेड : येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डावर शासन नियुक्त सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याच्या निर्णयास नांदेडमध्ये शीख समाजाकडून विरोध करण्यात आला आहे़ या निर्णयाच्या विरोधात आज काळा दिवस पाळण्यात आला़ जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले़

नांदेड येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड कायद्यात सुधारणा करत दोनऐवजी शासन नियुक्त सदस्य आठ राहतील असा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार नांदेड गुरुद्वारा बोर्डावर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर येथील शीख प्रतिनिधींची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे़ गुरुद्वारा बोर्ड अ‍ॅक्ट कायद्यातही ही सुधारणा अनावश्यक आणि स्थानिक शीख समाजाला विश्वासात न घेता केल्याचा आरोप गुरुवारी आंदोलनकर्त्यांनी केला़

यापूर्वी राज्य शासनाने १२ मार्च २०१५ रोजी गुरुद्वारा बोर्डाच्या कायद्यात संशोधन करून बोर्डाच्या अध्यक्षाची नियुक्ती शासन करेल असा निर्णय घेतला होता़ या निर्णयासही विरोध झाला होता़ आता आणखी सहा सदस्य नियुक्त करून शासन स्थानिकांना डावलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे़. गुरुद्वारा बोर्ड कायद्यानुसार दर तीन वर्षाला निवडणुका व्हाव्यात असे अपेक्षित आहे़ त्यामुळे विद्यमान गुरुद्वारा बोर्ड बरखास्त करून तीन जागांच्या निवडणुका जाहीर कराव्यात, गुरुद्वारा बोर्ड कायद्यातील कलम ११ नुसार अध्यक्षांची नियुक्ती शासन करेल हा आदेश रद्द करून गुरुद्वारा बोर्डाच्या १७ सदस्यांना अध्यक्ष निवडीचा अधिकार देण्यात यावा आणि गुरुद्वारा बोर्ड कायद्यात बदल किंवा संशोधन करण्यापूर्वी नांदेडच्या शीख समाजाची संमती मिळवावी त्यानंतरच कायद्यात तरतूद करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली़ 

या आंदोलनात स़देविंदरसिंघ मोटरवाले, स़इंद्रसिंघ गल्लीवाले, स़देविंदरसिंघ विष्णुपूरीकर, स़अवतारसिंघ पहेरेदार, अ‍ॅड़स़मदनमोहनसिंघ खालसा, स़रविंद्रसिंघ मोदी, स़जसपालसिंघ लांगरी, स़तेजपालसिंघ खेड, स़विरेंद्रसिंघ बेदी, सग़ुरुमीतसिंघ बेदी, स़जर्नेलसिंघ गाडीवाले, स़मोहनसिंघ गाडीवाले, स़जसप्रितसिंघ रोहीत, स़नरेंद्रसिंघ लिखारी आदींची उपस्थिती होती़ 

टॅग्स :Sachkhand Gurudwara Nandedसचखंड गुरुद्वारा नांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडagitationआंदोलनState Governmentराज्य सरकार