शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपामुळे देशात अराजकतेची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:36 IST

भाजपच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण झाली. सर्वच स्तरांत नैराश्य पसरले असून येणाऱ्या काळात देशाला मोठे नुकसान सहन करावे लागणार

ठळक मुद्देकुमार केतकर काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सामान्य माणूस केंद्रस्थानी

नांदेड : भाजपच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण झाली. सर्वच स्तरांत नैराश्य पसरले असून येणाऱ्या काळात देशाला मोठे नुकसान सहन करावे लागणार असल्याचे मत खा. कुमार केतकर यांनी नांदेडमध्ये व्यक्त केले.जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात खा. केतकर यांची पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, २०१४ मध्ये देशवासियांनी मोदींच्या हातात सत्ता दिली. मात्र जनतेचा भ्रमनिरासही झाला. ज्या घोषणा सत्ता येण्यापूर्वी भाजपाने केल्या होत्या. त्यातील किती योजनांची अंमलबजावणी झाली हा संशोधनाचा विषय आहे. दुसरीकडे देशात सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले. अराजकता निर्माण झाली. सरकारविरोधी बोलणे म्हणजे देशद्रोह ठरविण्यात आला. मोदी आणि अमित शहा यांनी सर्व नियम व स्वातंत्र्य मोडीत काढत हुकूमशाही आणली आहे. या दोघांनाही संसदेचा अभ्यास आणि अनुभव नसल्याचेही केतकर म्हणाले. देशात रोजगाराचा प्रश्न ‘जैसे थे’आहे. नोटाबंदीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. ज्या काळ्या पैशाच्या गोष्टी भाजपाने केल्या होत्या. तो काळा पैसा आलाच नाही. उलट नोटाबंदीच्या निर्णयाने अनेकांचा रोजगार हिरावला. इंदिरा गांधी यांच्या काळात संसदेचे सभागृह १६० ते १७० दिवस चालायचे. मोदींच्या काळात मात्र ते ६० ते ७० दिवसच चालत आहे. मोदींना अधिवेशन नको असते. २०१९ ची लोकसभा निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. २०१९ च्या निकालानंतर कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान विराजमान झाला तरी त्याला येणारे धोके झेलावे लागतील, ंअसेही ते म्हणाले.

  • काँग्रेसने २०१९ च्या निवडणुकीसाठी घोषित केलेला जाहीरनामा नेहमीपेक्षा वेगळा आहे. हा जाहीरनामा तयार करताना विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली आहेत. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार केला आहे. काँग्रेसचा हा जाहीरनामा म्हणजे ख-या अर्थाने जनतेचा जाहीरनामा आहे, असे सांगत काँग्र्रेसची सत्ता आल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपा