शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

थापेबाजीमुळेच भाजपाची विश्वासार्हता संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 01:02 IST

मी शब्द दिल्याप्रमाणे शहरातील ३८ कोटींच्या विकासकामे प्रारंभाने अर्धापूर शहराचा चेहरामोहरा बदलून जाणार असल्याचे प्रतिपादन खा़अशोकराव चव्हाण यांनी केले.

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांनी डागली तोफ पुलवामा सैनिकांचे यश, त्यावर राजकीय पोळी भाजू नका

अर्धापूर : मी शब्द दिल्याप्रमाणे शहरातील ३८ कोटींच्या विकासकामे प्रारंभाने अर्धापूर शहराचा चेहरामोहरा बदलून जाणार असल्याचे प्रतिपादन खा़अशोकराव चव्हाण यांनी केले. जनतेला दिलेल्या थापामुळे भाजपाच्या हातातून तीन राज्ये गेली. रमण गए, राणी गई, गए शिवराज मामा-अब जल्दही बंद होगा चाय वाले का ड्रामा़़़ अशा शब्दात विरोधकांवर प्रहार करीत पुलवामा घटनेबाबतीत भाजपावाल्यांनी राजकारण करु नये. पाकिस्तानच्या भूमीवर मिळविलेले यश हे सैनिकांचे असल्याचेही सुनावले.२ मार्च रोजी नगरपंचायत अंतर्गत पाणीपुरवठा योजना, घरकुल योजना, वाचनालय, व्यापारी संकुल, केशवराज मंदिर सुशोभिकरण, सी़सी़रस्ता अशा विविध विकासकामाचा प्रारंभ व बौद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा खा़अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता.अध्यक्षस्थानी चेअरमन गणपतराव तिडके होते. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात शहरातील विविध विकासकामे व योजनांविषयी माहिती दिली. खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की, राज्यात अजून कर्जमाफी चालूच आहे. दुधाला, भाजीपाल्याला भाव नसल्याने तो रस्त्यावर फेकून द्यावा लागत आहे. आरक्षणाच्या बाबतीत धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा थेट आरोपही अशोकराव चव्हाण यांनी यावेळी केला. येणाऱ्या निवडणुकीत महाआघाडी शिवसेना-भाजपाचा एकजुटीने पराभव करणार असून देशातील वातावरण बदलले आहे. याचा प्रत्यय लवकरच दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गोविंदराव शिंदे, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, भोकर तालुकाध्यक्ष जगदीश पाटील, मुदखेड तालुकाध्यक्ष उद्धवराव पवार, संजय लहानकर, पप्पू पाटील कोंढेकर, जि.प. सभापती शिला निखाते, जि.प.सदस्य संगीता अटकोरे, सभापती मंगल स्वामी, शमीम अब्दुला, जहागीरदार, नगराध्यक्षा प्रणिता सरोदे, आखतरउल्ला बेग, डॉ़ पल्लवी लंगडे, काँग्रेस शहराध्यक्ष राजू शेट्टे, पंडितराव लंगडे, नासेर खान, मुसव्वीर खतिब व सर्व नगरसेवक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष देवराये यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जि.प.सदस्य धर्मराज देशमुख यांच्या बंधुचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या घरी अशोकराव चव्हाणांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने अर्धापूर शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी केली.

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस