शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गाव जेवण'; चंद्रकांत पाटलांची कार्यकर्त्यांना ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 12:09 IST

देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे.

नांदेड: जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आगळी-वेगळी ऑफर दिली. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गावजेवण देणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे गाव जेवणात स्वतः सहभागी होणार असल्याचंही पाटील म्हणाले.

देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपने अनेक नेत्यांना देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी उतरवलं आहे. दरम्यान, काल आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत असताना त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या ऑफीरमुळे एकच चर्चा रंगली. 'भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गाव जेवण देणार आणि त्यावेळी मी स्वतः उपस्थित असणार', अस पाटील म्हणाले. 

भाजपकडून अनेक नेत्यांकडे प्रचाराची धुराभाजपने या निवडणुकीच्या प्रचारासाठी मोठ्या नेत्यांची फळी उतरवली आहे. आतापर्यंत रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, भागवत कराड आणि आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते प्रचारासाठी येत आहेत. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी देगलूर पोट निवडणुकीसाठी गावोगावी प्रचार सभा घेतल्या तर नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हेदेखील जोरदार प्रचार करत आहेत.

चंद्रकांत पाटलांनी यापूर्वीही दिली ऑफरदरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतही अशच प्रकारची एक ऑफर दिली होती. सांगली महापालिकेत कार्यक्रम करणाऱ्या नेत्यांना तुम्ही दोन छोटे शॉक दिले आहेत. एकदा एक मोठा शॉकद्या, तुमचा सोन्याचा मुकुट घालून सत्कार करतो, असं पाटील म्हणाले होते.

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलNandedनांदेडBJPभाजपाElectionनिवडणूक