शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

सभास्थळ झाले तुडुंब अन् भाजपाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सोडला सुस्कारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 00:50 IST

वर्धा येथील नरेंद्र मोदींची सभा चांगलीच गाजली मात्र त्या सभेला कमी गर्दी होती. त्यामुळे नांदेड येथील शनिवारच्या या सभेची भाजपा पदाधिकाऱ्यांनी धास्ती घेतली होती. शहरापासून काहीसे दूर असलेले सभास्थळ, सभेची वेळ सायंकाळनंतरची. मात्र त्यानंतरही सायंकाळी ६.३० वाजताच सभास्थळ तुडुंब भरले आणि भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

विशाल सोनटक्के ।नांदेड : वर्धा येथील नरेंद्र मोदींची सभा चांगलीच गाजली मात्र त्या सभेला कमी गर्दी होती. त्यामुळे नांदेड येथील शनिवारच्या या सभेची भाजपा पदाधिकाऱ्यांनी धास्ती घेतली होती. शहरापासून काहीसे दूर असलेले सभास्थळ, सभेची वेळ सायंकाळनंतरची. मात्र त्यानंतरही सायंकाळी ६.३० वाजताच सभास्थळ तुडुंब भरले आणि भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या निमित्ताने शिवसेना-भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते एका व्यासपीठावर आले.नांदेड येथील पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची ही तिसरी सभा होती. यापूर्वी शहरातीलच श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडियमवर त्यांची सभा पार पडली होती. त्यानंतर लोहा येथेही प्रचारसभा झाली होती. या दोन्ही सभेच्या तुलनेत शनिवारच्या सभेकडे सेना-भाजपासह विरोधकांचेही लक्ष लागले होते. वर्धा येथे नरेंद्र मोदी यांची नुकतीच प्रचारसभा झाली. यावेळी सभास्थळावरील काही भाग रिकामा होता. माध्यमातूनही याची चर्चा झाली होती. तसेच सोशल मीडियातूनही यावरुन भाजपाला ट्रोल केले जात होते. या पार्श्वभूमीवर सभा यशस्वी करण्याचे भाजपासमोर आव्हान होते. हे आव्हान भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यशस्वी पार पाडले.शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव, शिवसेनेचे दक्षिणचे आमदार आणि विद्यमान हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत पाटील, पदाधिकारी भाजपाच्या व्यासपीठावर उपस्थित होते. शिवसैनिकांचीही गर्दी होती. सभेच्या निमित्ताने झालेला एकोपा पुढे मतदानापर्यंत टिकतो का, हे आता पाहावे लागेल.स्पष्ट आवाज येत नसल्याने झाली घोषणाबाजीमोदी यांच्या सभास्थळी येण्यापूर्वी भाजप-सेनेच्या काही वक्त्यांची भाषणे सुरु होती़ परंतु, व्यासपीठाच्या उजव्या बाजूला ध्वनिक्षेपकाचा आवाजच येत नसल्यामुळे या भागातील नागरिकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली़बºयाच प्रयत्नानंतर साऊंड बॉक्सची दिशा तिकडे फिरविण्यात आली़ त्यानंतर नागरिक शांत झाले़मोदी यांच्या सभेसाठी मैदानात ठिकठिकाणी साऊंड बॉक्स लावण्यात आले होते़ परंतु, व्यासपीठाच्या उजव्या बाजूला असलेल्या साऊंड बॉक्सची दिशा चुकीच्या दिशेने करण्यात आली होती़ त्यामुळे आवाज येत नसल्यामुळे नागरिकांनी घोषणाबाजी केली़ यावेळी पत्रकारांच्या कक्षात असलेल्या व्यंकटेश साठे या भाजपाच्या पदाधिकाºयानेही अनेकवेळा हातवारे करुन व्यासपीठावरील इतर नेतेमंडळींच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला़ परंतु त्यांच्याकडे कुणाचे लक्षच गेले नाही़त्यानंतर साठे यांनी स्वत: कामगारांच्या मदतीने साऊंड बॉक्सची दिशा फिरविण्याचा प्रयत्न केला़ यावेळी साऊंड बॉक्स स्टँन्डही एका बाजूने झुकला होता़ त्यामुळे त्यांच्याशेजारी बसलेले पत्रकार उठून दुसरीकडे गेले़ ही बाब शेजारीच असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, तहसीलदार किरण अंबेकर यांनी पाहिली़ त्यानंतर कामगारांना सूचना देत साऊंड बॉक्सची दिशा बरोबर करायला लावली़ या सर्व गोंधळात लोकांची घोषणाबाजी मात्र सुरुच होती़सभास्थळी दुपारीच आलेल्या नागरिकांना सभेच्या ठिकाणी पाण्याची बाटली किंवा इतर साहित्य नेण्यास मज्जाव घालण्यात आला होता़ त्यामुळे प्रखर उन्हात नागरिकांना पाण्याविनाच बसावे लागले़सुरक्षेच्या कारणास्तव खाद्यपदार्थही नेण्यास बंदी होती़ अनेकांनी मोबाईल सोबत पावर बँक, हेडफोन आदी साहित्य आणले होते़ नागरिक सभास्थळी आल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या आठहून अधिक प्रवेशद्वारांतून आतमध्ये सोडण्यात येत होते़ त्यासाठी त्यांची कसून तपासणी करण्यात येत होती़ पायातील जोडेही काढून त्यांचीही पोलिसांद्वारे तपासणी करण्यात येत होती़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी