शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकी-ट्रकचा विचित्र अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 18:59 IST

दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. 

ठळक मुद्देदुचाकीच्या धडकेनंतर चालक रस्त्यावर कोसळला समोरून येणाऱ्या ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन मृत्यू 

मुखेड  (नांदेड ) : मुखेड शहरालगत दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एक दुचाकीस्वार समोरून येणाऱ्या ट्रक खाली आल्यामुळे जागीच ठार झाला. तर इतर दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी २:३० वाजता लातुर राज्यमार्गावर झाला. 

बापूराव माणिकराव टाळीकोटे ( ४२ , रा.कोडग्याळ) व त्याचा मेव्हणा सर्जेराव निवृत्ती देवकते ( २५, रा. हुलगंडवाडी) हे दोघे मुखेड येथील बाजारात खरेदीसाठी आले होते. खरेदीनंतर दोघेही मुखेडहून कोडग्याळकडे दुचाकीवरुन ( एम.एच. ४२ डब्ल्यू ३८०१ ) निघाले. याचवेळी समोरून नव्या दुचाकीवर विठ्ठल राठोड ( रा. निजामबाद)  हा कमळेवाडी येथील नातेवाईकांना भेटून मुखेडकडे परतत होता. या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. 

जोरदार धडकेने बापूराव टाळीकोट हे वाहनावरून रस्त्यावर पडले. याच वेळी मुखेडच्या दिशेने एक मालवाहू ट्रक येत जात होती. रस्त्यावर पडलेले बापूराव या ट्रकच्या मागच्या टायरखाली आले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर, पोलिस उपनिरिक्षक जि.डी.चित्ते, पोलिस जमादार धोंडिबा चोपवाड, किरण वाघमारे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. 

गंभीर जखमी सर्जेराव देवकते व विठ्ठल राठोड यांच्यावर मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बापूराव टाळीकोट यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा मोठा परिवार आहे. टाळीकोट परिवारातील कर्ता पुरूष गेल्यामुळे सर्वञ हळहळ व्यक्त आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNandedनांदेड