शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीवर अत्याचारातील दोषींना बडतर्फ करा; नीलम गोऱ्हे यांची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 17:47 IST

शंकरनगर येथील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे़

ठळक मुद्देराजकीय दबावाचा वापर शिक्षकांनी बॉन्डवर शपथपत्र लिहून घेतले़

नांदेड : बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे शाळेतील शिक्षकांनी सातवीतील विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणाची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ़ नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना तसे पत्र पाठविले आहे़ या प्रकरणातील दोषी मुख्याध्यापक आणि पदाधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी अशी सूचनाही त्यांनी केली आहे़ 

शंकरनगर येथील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे़ गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना दोन महिन्यापूर्वी घडली आहे़ याबाबत पीडितेच्या आईने मुख्याध्यापकाकडे तक्रार करुनही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला़ शिक्षक रसूल सय्यद, दयानंद राजूळे यांनी हे कृत्य केले असून मुख्याध्यापक प्रदीप पाटील, प्राचार्य शेळके आणि स्वंयपाकी रेखाबाई बनसोडे यांनी हे प्रकरण दडविण्यासाठी पीडितेच्या आईकडून शपथपत्र लिहून घेतले़ पीडितेची आई मुलीच्या आईचा अशिक्षितपणा पाहून शिक्षकांनी बॉन्डवर शपथपत्र लिहून घेतले़ तसेच त्याची नोटरी देखील केली़ याबाबत नोटरीचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी़ संबंधित आरोपींना मदत करणाऱ्या मुख्याध्यापक, पदाधिकारी यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा़ तसेच मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित मुलीला मदत मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ़नीलम गोऱ्हे यांनी लोहिया यांना केल्या आहेत़

राजकीय दबावाचा वापरमागासवर्गीय मुलीवर जिच्या डोक्यावर वडिलांचे छत्र नाही, आई मोलमजुरी करते अशी सर्व पार्श्वभूमी माहीत असलेल्या दोन शिक्षकांनी अत्याचार केला़ आज ती पीडित मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे़ या प्रकाराला वाचा फोडण्याचा आम्ही प्रयत्न केला़ परंतु राजकीय दबाव वापरत हे प्रकरण दडविण्याचा प्रयत्न करण्यात आला़ -रामचंद्र भरांडे, लोकस्वराज्य आंदोलन 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडStudentविद्यार्थी