शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बिलोली : ४९ ग्रामपंचायत हद्दीत पुन्हा चिअर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:37 IST

पाच हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील मद्य विक्री दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मार्च अखेर आलेल्या आदेशान्वये एक एप्रिल पासून परवाने नुतनीकरण सुरू झाले. नांदेड जिल्ह्यातील ४९ गावे महामार्गावर वसलेली आहेत, यापूर्वी नगरपालिका हद्दीतील परमीटरुम व दारु दुकानांना परवानगी देण्यात आली होती. आता ग्रामपंचायत क्षेत्रात ही अट शिथिल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देएक एप्रिलपासून परवाने देणे सुरु, वर्षभरापासून दारु दुकाने होती बंद

राजेश गंगमवार।लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : पाच हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील मद्य विक्री दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मार्च अखेर आलेल्या आदेशान्वये एक एप्रिल पासून परवाने नुतनीकरण सुरू झाले. नांदेड जिल्ह्यातील ४९ गावे महामार्गावर वसलेली आहेत, यापूर्वी नगरपालिका हद्दीतील परमीटरुम व दारु दुकानांना परवानगी देण्यात आली होती. आता ग्रामपंचायत क्षेत्रात ही अट शिथिल करण्यात आली आहे.महामार्गावरील अपघाताचे प्रमाण पाहता सर्वोच्य न्यायालयाने राष्टÑीय महामार्गापासून ५०० तर राज्य महामार्गापासून २२५ मीटर अंतरावर दारु दुकान असावे, असा आदेश दिला होता. आदेशामुळे १ एप्रिल २०१७ पासून जवळपास ९५ टक्के दारु दुकाने बंद झाली. सर्वोच्य न्यायालयात दारु दुकान व परमीटरुम मालक संघटनेने फेरविचार याचीका दाखल केल्यानंतर महानगरपालिका, नगरपलिका क्षेत्रात अंतराचा नियम लागू राहणार नाही, असे आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिले. यानंतर १० सप्टेंबर १७ पासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शहरातून जाणाºया महामार्गावरील दारु विक्रीचा मार्ग मोकळा झाला व सर्व अनुज्ञाप्ती- परवाने नुतणीकरण करण्यात आले.नांदेड जिल्ह्यात महामार्गावर ४९ गावेसन २०११ च्या जनगणनेनुसार नांदेड जिल्ह्यात पाच हजार लोकसंख्येची ४९ गावे आहेत. आता नव्याने ४९ परवानाधारकांना दारु दुकान सुरु करण्याची संधी मिळाली. ३१ मार्च २०१८ अखेर फीस भरुन बंद पडलेली दुकाने अनेकांनी सुरु केली. प्रामुख्याने मुक्रमाबाद, नरसी, हणेगाव, करडखेड, लोहगाव, जांब, बाºहाळी, मरखेल, सगरोळी,सोनखेड, कलंबर, कुरुळा, मनाठा, निवघा, तामसा, बोधडी, गोकुंदा येथील दुकानदारांनी दुकाने सुरु केली. २०१७ ची लोकसंख्या गृहीत धरल्यास आणखी ४० दुकाने सुरु होऊ शकतील.आयुक्तांनी काढले आदेशराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त अश्विनी जोशी यांच्या ३१ मार्च २०१८ च्या आदेशाचे पत्र सर्व अधीक्षकांना देण्यात आले. त्यानुसार अनुज्ञाप्ती धारकांकडून सन २०१८-१९ ची शुल्क भरुन तत्काळ परवाने सुरू करण्याचे आदेश जारी झाले.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाhighwayमहामार्ग