शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

डांबरात बड्या कंत्राटदाराचे हात काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:14 IST

शासकीय कंपनीकडून डांबर खरेदी न करता खाजगी व्यक्तीकडून डांबर खरेदी करीत रस्त्यांची बोगस कामे करण्यात नांदेड जिल्हा राज्यात आघाडीवर आहे़

ठळक मुद्देप्रशांत बंब : पुरवठादार, अधिकारीही मोकळेच

नांदेड : शासकीय कंपनीकडून डांबर खरेदी न करता खाजगी व्यक्तीकडून डांबर खरेदी करीत रस्त्यांची बोगस कामे करण्यात नांदेड जिल्हा राज्यात आघाडीवर आहे़ डांबर घोटाळ्याची राज्यभर व्याप्ती असून या प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली आहे़ परंतु,अद्यापही अनेक मोठे कंत्राटदार यातून मोकळेच असल्याची माहिती आ़प्रशांत बंब यांनी दिली़एका कार्यक्रमानिमित्त आ़ बंब हे नांदेडात आले होते़ आ़बंब यांनीच हे प्रकरण उघडकीस आणले होते़ नांदेडात या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन कंत्राटदारांना नुकताच जामीन मिळाला आहे़ तर तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी, फरार असलेले तीन कंत्राटदार पोलिसांना सापडलेच नाहीत़ विशेष म्हणजे, हे कंत्राटदार नांदेडातच बिनदिक्कतपणे फिरत असल्याची माहिती हाती आली आहे़ त्याचबरोबर चीनकडून डांबर खरेदी करणाऱ्या मुंबईतील व्यापाºयाकडून नांदेडातील डांबरशेठ यांचे लागेबांधेही आतापर्यंत उघड झाले नाहीत.या डांबरशेठकडून नांदेडातील अनेक बड्या कंत्राटदारांनी डांबर खरेदी केले आहे़ त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले असून डांबरशेठच्या डांबरामुळे रस्त्यांची काही दिवसांतच चाळणी झाल्याची उदाहरणेही समोर आहेत़ परंतु, डांबर खरेदी करणारे अन्य कंत्राटदार अद्यापही मोकळेच आहेत़ त्याचबरोबर डांबरशेठ आणि घोटाळ्यात मदत करणाºया अधिकाºयांवरही कोणतीही कारवाई झाली नाही़ त्यामुळे डांबराचा हा सर्व तपासच संशयाच्या भोव-यात सापडला आहे़२००८ मध्ये गुरु-त्ता-गद्दीच्या काळात आणि त्यानंतरही नांदेडात मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे करण्यात आली होती़ त्यामुळे या घोटाळ्यात राज्यात नांदेड अव्वल ठरले आहे़ हे प्रकरण अद्याप संपले नसून या घोटाळ्यासाठी नांदेडच्याच अधिकाºयांनी प्रोत्साहन दिले आहे़

टॅग्स :NandedनांदेडfraudधोकेबाजीNanded policeनांदेड पोलीसPrashant Bambप्रशांत बंब