शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकान बंदसाठी लाभार्थी एकवटले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 01:07 IST

शहरातील देशमुखनगर येथील धुरपतबाई नबाजी जेठे या नावाने असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडून भास्करनगर येथील ७८ रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्याचे रेशन मिळत नसल्याने सर्व लाभार्थी एकवटून स्वस्त धान्य दुकान बंद करण्यासाठी पुरवठाचे नायब तहसीलदार उत्तम निलावाड यांना निवेदन दिले़

ठळक मुद्दे७८ लाभार्थ्यांना तीन महिन्यांपासून धान्य मिळेना महिलांनी मांडले गा-हाणे

बिलोली : शहरातील देशमुखनगर येथील धुरपतबाई नबाजी जेठे या नावाने असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडून भास्करनगर येथील ७८ रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्याचे रेशन मिळत नसल्याने सर्व लाभार्थी एकवटून स्वस्त धान्य दुकान बंद करण्यासाठी पुरवठाचे नायब तहसीलदार उत्तम निलावाड यांना निवेदन दिले़सदरील दुकानाचा परवाना एकाच्या नावावर व कारभार मात्र दुसऱ्यांकडे असल्याने दुकानदाराकडून लाभार्थ्यांना अरेरावीची भाषा, दर महिन्याला कागदपत्रांना पैसे हवे आहेत म्हणून प्रत्येक कार्डधारकांकडून २०० रुपये घेणे, चना व तुरीची डाळ वाटप न करताना काळ्या बाजारात विकणे व स्वस्त धान्यांचे वाटप एका जनावरांच्या गोठ्यात करीत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.यासह शासकीय नियमाप्रमाणे अंत्योदय, बीपीएल, शेतकरी प्राधान्य या लाभार्थ्यांना तांदूळ प्रतिकिलो ३ रुपये तर गहू २ रुपये प्रतिकिलो दराने दिला जावा, असा नियम असताना या स्वस्त धान्य दुकानदाराकडून ३५ किलो धान्यांसाठी ८५ रुपयांऐवजी १५० रुपये घेतले जात असल्याने लाभार्थ्यांची पिळवणूक होत असल्याने महिला लाभार्थ्यांनी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदारासमोर गाºहाणे मांडले़ सदरील दुकानाचा परवाना तात्काळ बंद करुन गत ३ महिन्यांपासून वंचित असलेल्या ७८ लाभार्थ्यांना धान्य देण्याची मागणी केली. मागण्या पूर्ण न दिल्यास २५ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा निवेदनामध्ये दिला आहे.सदरील दुकानाचा परवाना तात्काळ बंद करा व गत तीन महिन्यांपासून वंचित असलेल्या ७८ लाभार्थ्यांना धान्य न दिल्यास २५ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.निवेदनावर नगरसेवक जावेद कुरेशी, शारदा पोतुलवार, शिवाजी तुडमे, लक्ष्मीबाई दंडलवाड, नजीर बेग, लक्ष्मीबाई जाधव यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षºया आहेत. अनेकांच्या तक्रारीवरुन गत काही दिवसांपूर्वी बिलोली पुरवठा विभागाकडून सदरील दुकानाची चौकशी झाली व लाभार्थ्यांनी केलेली तक्रार खरी ठरली मात्र याकडे वरिष्ठांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती नगरसेवक जावेद कुरेशी यांनी दिली़

मी अंत्योदय रेशन कार्डधारक लाभार्थी असून मला गत २ महिन्यांपासून स्वस्त धान्य मिळाले नाही़ धान्यासाठी गेले असता उलट मला वाढप्याकडून शिव्या खाव्या लागत आहेते. सदरील दुकान बंद करा अन्यथा उपोषण करणार -शारदाबाई पोतुलवार, अंत्योदय लाभार्थी, बिलोली

देशमुखनगर येथील धुरपतबाई नबाजी जेठे या परवानाधारकाकडून लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक छळले जात असून लाभार्थ्यांना स्वस्त धान्यापासून वंचित ठेवले जात आहे. स्वस्त धान्य दुकानची चौकशी केली व लाभार्थ्यांचा जबाब घेऊन सदरील परवाना रद्द करण्याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे - उत्तम निलावाड, पुरवठा अधिकारी बिलोली़

टॅग्स :Nandedनांदेडagitationआंदोलन