शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉकला निघालेल्या ज्येष्ठ पत्रकारास मारहाण; चाकूच्या धाकावर लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 11:29 IST

शहरातील डीमार्ट परिसरात मागील काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्या आणि वाटमारीच्या घटना वाढल्या आहेत.

नांदेड :  मॉर्निंग वॉकला निघालेल्या ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मारहाण करत व चाकूचा धाक दाखवत लुबाडले. ही घटना शनिवारी पहाटे पाच वाजता घडली.

शहरातील डीमार्ट परिसरात मागील काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्या आणि वाटमारीच्या घटना वाढल्या आहेत.  कॅनॉल रोड परिसरात मॉर्निंग वॉक करण्यासाठी हजारो महिला नागरिक पहाटे रस्त्यावर असतात. परंतु,  पहाटे पाच ते सहा या वेळेत रस्त्यावर असणारी तुरळक गर्दी आणि अंधाराचा फायदा घेत लुटमार केली जात आहे.  शनिवारी पहाटे ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी आणि त्यांचे मित्र पाटील हे छत्रपती चौक ते डी मार्ट रस्त्यावर वॉकिंग करत असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना अडवून मारहाण केली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील महागडा मोबाईल काढून घेतला. त्यानंतर चोरटे पसार झाले. दरम्यान, यासंदर्भात भाग्यनगर ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तत्पूर्वी घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चोरट्याचा शोध लावला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. 

यापूर्वीही घडले असे प्रकारछत्रपती चौक ते निळा टी पॉईंट या कॅनॉल रस्त्यावर वाहनांची रहदारी कमी असल्याने नागरिक वॉकिंगसाठी या रस्ताला पसंती देतात. सायंकाळी आणि पहाटे या रस्त्यावर महिलांसह ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतु मागील काही दिवसांत वाढलेल्या लुटमारीच्या घटनांमुळे वॉक करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यापूर्वी वॉक करणाऱ्या एका शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन चोरट्यांनी लांबविले होते. त्याचबरोबर चाकूचा धाक दाखवून मोबाईल काढून घेण्याच्या अनेक घटना घडल्या. परंतु बहुतांश घटना रेकॉर्डवर नाहीत.

अंधारामुळे वाढले प्रकारछत्रपती चौक ते निळा टी पॉईंट हा रस्ता ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. त्यामुळे पथदिव्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग घ्यायला तयार नाही. तर ग्रामपंचायतीकडून नेहमीच हा भाग दुर्लक्षित राहिला आहे. या रस्त्यावर कायम अंधार असतो. तसेच फुटपाथवर दारुड्याचे घोळके ठिकठिकाणी बसलेले असतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड