नांदेड : कोरोनामुळे लग्नसराईत खंड पडला आहे. सार्वजनिक सोहळेही रद्द झाले आहेत. त्यामुळे तरुणाई अधिक वेळ मोबाइलवरच राहत आहे. त्यात रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर ऑनलाइन असलेल्या तरुणांना जाळ्यात ओढणारी टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीकडून तरुणांशी अगोदर मैत्री करण्यात येते. त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात येते. लग्नाची मागणीही घालण्यात येते. अशा प्रकारे एक वेळेस समोरील व्यक्ती गळाला लागल्यानंतर पैशाची मागणी करण्यात येते. जिल्ह्यात अशा फसवणुकीच्या घटना झाल्या आहेत.
n सोशल मीडियावर सायबर गुन्हेगार अकाउंट उघडून त्या ठिकाणी सुंदर मुलीचे छायाचित्र लावतात. त्यानंतर समोरील व्यक्तीशी संपर्क करण्यात येतो.
n अनेक दिवस सोशल मीडियाद्वारे संवादही सुरू राहतो. एकमेकांच्या कुटुंबाचीही माहिती घेण्यात येते. त्यानंतर अचानक एके दिवशी खरेदीसाठी पैशाची मागणी होते.
नांदेडातील एका तरुणासोबत औरंगाबादच्या तरुणीने लग्नासाठी ओळख वाढविली. दोघेही अनेक दिवस एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर काही दिवसांनी हा तरुण मित्रांना घेऊन लग्नासाठी औरंगाबादला गेला. या ठिकाणी तरुणीच्या इतर साथीदारांनी मारहाण करून त्यांच्या जवळील रोख रक्कम काढून घेतली.