शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

नांदेड जिल्ह्याला अवकाळीचा दणका; बारा मंडळात अतिवृष्टी; पिके पाण्याखाली

By प्रसाद आर्वीकर | Updated: November 27, 2023 15:13 IST

जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस

प्रसाद आर्वीकर, नांदेड:  जिल्ह्यात रब्बी हंगामातही अवकाळी पावसाने दणका दिला असून, बारा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. पावसामुळे अनेक भागात पिके पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार २७ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याला प्रारंभ झाला. सोसाट्याचे वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह मुसळधार पाऊस बरसला.

या पावसाने शेत शिवारात पाणी साचले आहे. हरभऱ्याचे पीक पाण्याखाली गेले असून उसाच्या पिकालाही फटका बसला आहे.जिल्ह्यातील बारा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, नांदेड तालुक्यातील लिमगाव मंडळात सर्वाधिक ९९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नांदेड शहर परिसरात ६८, तरोडा मंडळात ८२.३०, नाळेश्वर ७०.८०, अर्धापूर तालुक्यांत अर्धापूर ७७.५०, दाभड ६९, कंधार तालुक्यातील उस्माननगर ७६.३०, लोहा तालुक्यातील सोनखेड ७६.३०, कलंबर ७६.३०, शेवडी ७४, हदगाव तालुक्यातील तामसा ६५.३० आणि पिंपरखेड मंडळामध्ये ६५.३० मिलिमीटर पाऊस झाला. या सर्व मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान २६ नोव्हेंबर रोजी पहाटे दोन तासांमध्ये सरासरी ३६.५० मिलिमीटर पाऊस झाला. अर्धापूर तालुक्यात सर्वाधिक ६७.३०मिली पावसाची नोंद झाली.

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेड