शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाहीला तेलंगणा एसटी प्रशासनाकडून सापत्न वागणूक; थांबण्यासाठी पॉर्इंटही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 19:23 IST

नांदेड विभागातून सर्वप्रथम नांदेड-हैदराबाद-नांदेड मार्गावर शिवशाही बसेस सोडल्या जात आहेत़ नांदेडहून अनेक रेल्वे हैदराबादकडे धावत असल्याने या गाडीला अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे़ तर निजामाबाद बसस्थानकात बस उभी करण्याच्या पॉर्इंटवरून तेलंगणा एसटी महामंडळाकडून शिवशाही बसेसबाबत सापत्न वागणूक दिली जात आहे़ 

ठळक मुद्देनांदेड विभागात दाखल झालेल्या शिवशाही बस नांदेड - हैदराबाद- नांदेड मार्गावर सोडण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला़ पहिल्याच दिवशी राज्य सीमेवर कागदपत्रांच्या नावावर निजामाबाद आरटीओंनी शिवशाहीची अडणूक केली़

- श्रीनिवास भोसले

नांदेड : नांदेड विभागातून सर्वप्रथम नांदेड-हैदराबाद-नांदेड मार्गावर शिवशाही बसेस सोडल्या जात आहेत़ नांदेडहून अनेक रेल्वे हैदराबादकडे धावत असल्याने या गाडीला अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे़ तर निजामाबाद बसस्थानकात बस उभी करण्याच्या पॉर्इंटवरून तेलंगणा एसटी महामंडळाकडून शिवशाही बसेसबाबत सापत्न वागणूक दिली जात आहे़ 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यभरात आरामदायी प्रवासासाठी वातानुकूलित शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत़ खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांना मिळणार्‍या सुविधा आणि आरामदायी गाड्यांच्या तुलनेत एसटीचा प्रवास नकोसा होत होता़ त्यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी राज्यभर शिवशाही वातानुकूलित गाड्या लांब पल्ल्यासाठी सुरू करण्यात आल्या़ अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नांदेड विभागात दाखल झालेल्या शिवशाही बस नांदेड - हैदराबाद- नांदेड मार्गावर सोडण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला़ परंतु, पहिल्याच दिवशी राज्य सीमेवर कागदपत्रांच्या नावावर निजामाबाद आरटीओंनी शिवशाहीची अडणूक केली़ हे ग्रहण कायम असल्याचे चित्र आजही पहायला मिळत आहे़ तेलंगणा राज्यात गरूडा, इंदिरा, राजधानी आदी वातानुकूलित गाड्या निजामाबाद ते हैदराबाद मार्गावर चालविण्यात येतात़ 

निजामाबाद बसस्थानकात वातानुकूलित बसेस उभ्या करण्याचा स्वतंत्र पॉर्इंट असल्याने प्रवासीदेखील त्याच ठिकाणी थांबतात, परंतु  शिवशाही गाड्या वातानुकूलित असून याठिकाणी उभ्या करू दिल्या जात नाहीत़ त्यामुळे चालक, वाहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्याचबरोबर अपेक्षित प्रवासीदेखील मिळत नाहीत़ शिवशाही गाड्यांना नांदेड ते निजामाबाददरम्यान प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद आहे़  तर निजामाबाद ते हैदराबाद या मार्गावर बर्‍यापैकी प्रवासी मिळत असल्याचे काही वाहकांनी सांगितले.

 नांदेड-हैदराबाद मार्गावर दररोज सहा शिवशाही गाड्या सोडण्यात येत आहेत़ प्रत्येक गाडीला दिवसाकाठी किमान ३९ ते ४० हजार उत्पन्न अपेक्षित आहे, परंतु प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने केवळ ३० ते ३२ हजार रूपये उत्पन्न होत आहे. नांदेड येथून हैदराबादसाठी रात्रीला पॅसेंजर व इतर एक्स्प्रेस रेल्वे आहेत़ कमी तिकिटात आरामदायी प्रवास असल्याने प्रवासी रेल्वे प्रवासालाच पसंती देतात़ त्यामुळे नांदेड-हैदराबाद मार्गावर धावणार्‍या शिवशाही गाड्यांना अपेक्षित उत्पन्न मिळणे कठीण आहे़ 

पुणे, मुंबई प्रवाशांना शिवशाहीची प्रतीक्षानांदेड येथून पुणे, मुंबईला दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात़  नांदेड-पुणे मार्गावर चाळीस ते पन्नास खाजगी ट्रॅव्हल्स धावतात़ दिवाळी, उन्हाळी सुट्यांमध्ये चार ते पाच पट तिकीट घेवून खाजगी कंपन्यांकडून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते़ नांदेड-पुणे मार्गावर शिवशाही सुरू करण्याची गरज असताना एसटी प्रशासनाने या मार्गाकडे दुर्लक्ष केले आहे़ मुंबई, पुणे मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांशी असलेल्या ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे मागणी असूनही रेल्वे सोडली जात नसल्याचा आरोप नेहमीच होतो़ त्याचप्रमाणे एसटीचेही संबंध असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये सुरू आहे.

टॅग्स :state transportएसटीShivshahiशिवशाही