याप्रसंगी गुणगौरव सोहळ्याला उपस्थित द ब्राइट स्टार इंग्लिश मीडियम स्कूल उमदरी, तालुका मुखेडचे प्राचार्य कैलास मुंडकर यांची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमात शाळा व नवोदितांच्या कवीने कविता सादर करण्यात आल्या. त्यामध्ये दिगंबर मुदखेडे यांनी गुरुजी तुम्ही शिकवा धडा कवितेच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षक यामध्ये काय दुवा असतो, त्यांनी स्वलिखित लेखन करून वाचन करण्यात आले. या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील कलावंत व कवी लेखक साहित्यिक वृत्तपत्राचे संपादक उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील विविध राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. मुदखेडे सर यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात आले.
सुजलेगावकर यांना पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:15 IST