शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
3
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
4
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
5
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
6
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
7
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
8
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
9
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
10
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
11
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
12
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
13
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
14
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
15
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
16
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
17
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
18
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
19
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
20
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला

समविचारी मतांचे विभाजन टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:21 IST

मुस्लिम आणि मागासवर्गीयांच्या मतांचे विभाजन झाल्यास भाजपालाच त्याचा फायदा होणार आहे़ त्यामुळे या मतांचे विभाजन टाळण्याची गरज आहे़ विरोधकांचा हा डाव आपल्याला हाणून पाडायचा आहे़ त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करायचे आहे़

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण : लोहा, कंधारात पाण्याऐवजी दारुचे वाटप

नांदेड : मुस्लिम आणि मागासवर्गीयांच्या मतांचे विभाजन झाल्यास भाजपालाच त्याचा फायदा होणार आहे़ त्यामुळे या मतांचे विभाजन टाळण्याची गरज आहे़ विरोधकांचा हा डाव आपल्याला हाणून पाडायचा आहे़ त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करायचे आहे़ असे प्रतिपादन खा़ अशोकराव चव्हाण यांनी केली़ यावेळी चिखलीकरांचे नाव न घेता लोहा-कंधारात पाण्याऐवजी दारुचेच वाटप अधिक वाटप होत असल्याचे टीकास्त्रही त्यांनी सोडले़नाळेश्वर येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती़ या सभेला आ़डी़पी़सावंत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष डॉ़ सुनील कदम, प्रा़प्रकाश पोपळे, हरिभाऊ शेळके, तातेराव पाटील आलेगांवकर, बाजीराव वाघ, सुखदेव जाधव, निलेश पावडे, शीला निखाते, साहेबराव धनगे, शिवाजी पावडे, किशोर पाटील, नरहरी वाघ, माधवराव वाघ, अतुल वाघ यांची उपस्थिती होती़ यावेळी खा़ चव्हाण म्हणाले, देशात शेतकऱ्यांवर भाजीपाला रस्त्यावर फेकण्याची वेळ या सरकारने आणली़ १५ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या़ तरी हे सरकार गप्प आहे़ या सरकारला आता मत मागायला लाज कशी वाटत नाही़ तुराटी येथे शेतकºयाने स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली़ सर्वसामान्यांच्या हिताच्या सर्व योजना बंद केल्या़ उज्ज्वला गॅस योजना फसवी आहे़ बेरोजगारांचे लोंढे कामाच्या शोधात फिरत आहेत़ परंतु सरकारकडून त्यांची अवहेलनाच होत आहे़ दुष्काळनिधीच्या वाटपातही भाजपाकडून भेदभाव करण्यात येत आहे़ आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर स्वतंत्र शेतकरी अर्थसंकल्प तसेच किमान वेतन योजनेद्वारे प्रतिवर्षी ७२ हजार रुपये बँक खात्यात टाकले जातील़ दिवंगत शंकरराव चव्हाण व पद्मश्री श्यामराव कदम यांच्यामुळेच विष्णूपुरी, अप्पर पैनगंगा प्रकल्प झालेत़ त्यामुळे हा भाग सुजलाम् सुफलाम् झाला़ भाजपा उमेदवाराने बंद केलेले कारखाने आम्ही सुुरु करु़ असेही ते म्हणाले़ तर आ़डी़पी़सावंत यांनी सरकारवर घणाघाती टीका करीत भाजपाला अंबानीचा जीओ वाढवायचा आहे असे सांगितले़ शेतकरी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, व्यापारी, विद्यार्थ्यांची बिकट अवस्था झाली आहे़ आश्वासनांची पूर्तता होत नसल्यामुळे राम मंदिर, देशभक्ती, देशद्रोह यासारखे विषय समोर आणले जात आहेत़मोदींची सत्ता आल्यास मतदानाचा हक्क राहणार नाही, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष डॉ़ सुनील कदम म्हणाले. मोदींची सत्ता आल्यास मतदानाचा हक्क राहणार नाही़ बोलण्याच्या अधिकारावरही गदा आणली जात आहे़ राजकारणात मोदी पवारांचे बोट धरुन आले अन् आता त्यांच्याच घराण्याबद्दल बोलत आहेत़ ज्यांना कुटुंब नाही, त्यांनी इतरांच्या कुटुंबाबद्दल बोलू नये.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस