शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

नांदेड जिल्ह्यात दररोजच्या पेट्रोल विक्रीत सरासरी २० हजार लिटरची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:52 IST

जिल्ह्यातील शंभरावर पेट्रोलपंपांना त्याचा फटका बसला असून सरासरी एका पेट्रोलपंपावर २०० ते २५० लिटर पेट्रोलची विक्री कमी झाली आहे.

ठळक मुद्देपावणेदोन कोटींचे पेट्रोल खपेना

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढत असल्यामुळे बहुतांश नागरिकांनी गाड्या वापरण्याचे प्रमाण कमी केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शंभरावर पेट्रोलपंपांना त्याचा फटका बसला असून सरासरी एका पेट्रोलपंपावर २०० ते २५० लिटर पेट्रोलची विक्री कमी झाली आहे. त्यातून पेट्रोल पंपचालकांच्या व्यवसायाला जवळपास पावणेदोन कोटी रुपयांच्या फटका बसला आहे.देशभरात सध्या पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील दुचाकीस्वारांची १०० तर चारचाकी चालकांची ५०० रुपयांचे पेट्रोल भरण्याची मानसिकता आहे. पूर्वी १०० रुपयाचे पेट्रोल भरले तर १.२२ लिटर पेट्रोल येत होते. ते आता १.६ ते १.७ लिटर मिळते. साधारणपणे चार दिवस पुरणारे पेट्रोल आता दोनच दिवसांत संपत आहे. त्यामुळे वाहनचालकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच गाडीचा वापर केला जात आहे. एरव्ही सर्वच पेट्रोलपंपावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. आता मात्र पंपावर वाहनांची संख्या किरकोळ दिसत आहे.नांदेड जिल्ह्यात आजघडीला शंभरावर पेट्रोलपंप आहेत. इंधन दरवाढीनंतर सरासरी २० ते २५ टक्क्यांनी विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे सरासरी एका पेट्रोलपंप चालकाचा २५ ते ३० हजार रुपयांचा व्यवसाय बुडाला आहे. जिल्ह्यातील १०० पेट्रोलपंपाचा विचार केल्यास हा आकडा पावणेदोन कोटीपर्यंत जात आहे. त्याचबरोबर पेट्रोलपंपावर अवलंबून असलेल्या इतर व्यवसायांवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत पेट्रोलचे दर एक पैशापासून ते पाच ते सात पैशांनी कमी करण्यात आले होते़ परंतु, इंधन दरवाढीने होरपळणाऱ्या नागरिकांच्या जखमेवर हा मीठ चोळण्याचाच प्रकार सरकारने केल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना होती़ येत्या काही दिवसांत इंधनाचे दर कमी न झाल्यास नागरिकांच्या संयमाचा बांध तुटून मोठा भडका उडू शकतो़---पेट्रोल विक्रीत झाली घटपेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याचा विक्रीवर परिणाम होत आहे़ पेट्रोलपंपचालकांना लिटरवर कमिशन मिळत असते़ परंतु, काही दिवसांत सरासरी पेट्रोलपंप चालकांची विक्री २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाली़ त्यामुळे इतर खर्चावरही परिणाम झाला, अशी प्रतिक्रिया पेट्रोलपंपचालक सचिन पाळेकर यांनी दिली़---मागील आठ दिवसांत असे होते दर२६ मे रोजी नांदेड शहरात पेट्रोलचे दर ८७़२५ पैसे तर डिझेल ७३़६८ पैसे लिटर होते़ २७ मे- पेट्रोल-८७़४०, डिझेल-७३़८४, २८ मे पेट्रोल-८७़५४, डिझेल-७३़९६, २९ मे पेट्रोल-८७़७०, डिझेल-७४़१०, ३० मे पेट्रोल-८७़७९, डिझेल-७४़०९, ३१ मे पेट्रोल-८७़६२, डिझेल-७४़०४, १ जून पेट्रोल-८७़५६, डिझेल-७३़९९, २ जून पेट्रोल-८७़४७, डिझेल-७३़८९ तर ३ जून रोजी नांदेडात पेट्रोल-८७़८९ तर डिझेल ७३़८९ पैसे लिटर होते़कोणत्याही ठिकाणी कामासाठी जायचे असल्यास पूर्वी सर्रासपणे दुचाकीचा वापर केला जात होता. आता मात्र पेट्रोलच्या बचतीसाठी डबल आणि ट्रीपल सिटचा वापर वाढला आहे.पेट्रोल दरवाढ झाल्यानंतर सार्वजनिक प्रवासी वाहतुकीत वाढ होते.

टॅग्स :NandedनांदेडPetrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प