शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

अशोक चव्हाण विधानसभेच्या रिंगणात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:22 IST

उमेदवारी बाबत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडू असेही त्यांनी बैठकीत स्पष्ट केल्याने खा़चव्हाण विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत़

ठळक मुद्देमुंबईत आढावाकार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींना कळविणार असल्याचे केले स्पष्ट

नांदेड : खा़ अशोक चव्हाण यांनी विधानसभेची निवडणुक लढवुन महाराष्ट्रातच सक्रीय रहावे अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे़ कार्यकर्त्यांच्या याच भावना गुरुवारी खा़ चव्हाण यांनी मुंबई येथील आढावा बैठकीत बोलून दाखविल्या़ मात्र उमेदवारी बाबत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडू असेही त्यांनी बैठकीत स्पष्ट केल्याने खा़चव्हाण विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत़काही महिन्यापूर्वी विष्णूपुरी येथे झालेल्या एका कार्यक्रमात जिल्ह्यातील स्थानिक कार्यकर्त्यांनी खा़अशोकराव चव्हाण यांनी आगामी निवडणूक दक्षिण विधानसभा मतदारसंघातून लढवावी असा आग्रह धरला होता़ विशेष म्हणजे याच कार्यक्रमात आ़अमरनाथ राजूरकर यांनीही नांदेडकरांच्या भावना बोलून दाखविल्या होत्या़ खा़चव्हाण यांनी विधानसभेची निवडणूक दक्षिण मतदारसंघातून लढविल्यास काँग्रेसची जिल्ह्यात आणखी एक जागा वाढेल असे विधान करीत कार्यकर्ते आपणाकडे भावी मुख्यमंत्री म्हणुन पाहत आहेत़ त्यामुळे लोकसभेएवजी विधानसभा लढविल्यास दक्षिण मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने काँग्रेस निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला होता़आ़राजूरकर यांनी केलेल्या या विधानानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हा विषय चांगलाच चर्चेला आला होता़ विशेषत: भाजप-सेनेसह विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या विधानाचा धसका घेतल्याचे चित्र होते़ तर काहींनी विधानसभा लढविण्याची ही गुगली म्हणजे पक्षांतर्गत इच्छूकांना दिलेला इशारा असल्याचे म्हटले होते़दरम्यान, मुंबई येथील टिळक भवनात गुरुवारी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला़ या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ आणि बी़ एम़ संदीप यांचीही उपस्थिती होती़ या बैठकीत नांदेडचा विषय निघाल्यानंतर नांदेडमधील पदाधिकाऱ्यांनी खा़ चव्हाण यांनी विधानसभेच्या रिंगणात उतरावे अशी आग्रही मागणी केली़ यात आ़अमरनाथ राजूरकर, आ़ वसंतराव चव्हाण, महापौर शिलाताई भवरे, उपमहापौर विनय गिरडे, स्थायी समिती सभापती शमीम अब्दुला, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलिकर यांच्यासह पदाधिकारी आघाडीवर होते़ खा़चव्हाण यांनी विधानसभा लढविल्यास जिल्ह्यातील काँग्रेसच्या जागा आणखी वाढतील असा दावाही या पदाधिकाºयांनी बैठकीत केला़ यावर अशोकराव चव्हाण यांनी ‘मी’ नांदेड जिल्ह्यातून विधानसभा निवडणुक लढवावी अशी इच्छा काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत़ लोकसभा आणि विधानसभा यातील कुठल्याही निवडणुकीची माझी तयारी आहे़ मात्र या संदर्भात पक्षाचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, जी जबाबदारी पक्ष देईल ती आपण पार पाडू असे खा़अशोक चव्हाण यांनी या बैठकीत स्पष्ट केले़दरम्यान, खा़अशोक चव्हाण यांना पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविल्यास आ़वसंतराव चव्हाण काँग्रेसकडून खासदारकीचे उमेदवार असतील अशी शक्यता वर्तविली जात होती़ मात्र वसंतराव चव्हाण यांनी नायगाव मधूनच लढावे असाही तेथील कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने आ़अमिता चव्हाण यांचाच पर्याय काँग्रेससाठी दिसतो आहे़अशोक चव्हाण नेमके कोणत्या विधानसभा मतदारसंघातून उतरतील याचीही चर्चा आता जोर धरु लागली आहे़ नांदेड दक्षिण बरोबरच भोकर विधानसभा यापैकी एका मतदारसंघातून ते विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे़ त्यातही भोकर मतदारसंघाला ते अधिक प्राधान्य देवू शकतात़ अशा पद्धतीचे उलटफेर झाल्यास काँग्रेसचा फायदा होण्याचीच शक्यता आहे़तर लोकसभेसाठी अमिता चव्हाण असतील उमेदवारखा़अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणुक लढवावी असा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे़ खा़ चव्हाण यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे़ त्यामुळे विधानसभेसाठी अशोक चव्हाण उभे राहिल्यास लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते राज्यभरात फिरु शकतात़ याचा पक्षाचाही मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे आ़ राजूरकर यांनी या बैठकीत स्पष्ट केले़ खा़ चव्हाण यांना विधानसभेसाठी पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखविल्यास काँग्रेसकडून लोकसभेसाठी चव्हाण यांच्या कुटुंबातीलच सदस्यास उमेदवारी द्यावी असाही आग्रह धरण्यात आलेला असल्याने संभाव्य उमेदवार म्हणुन आ़अमिता चव्हाण यांचे नाव पुढे येत आहे़ याबरोबरच खा़ अशोक चव्हाण यांच्या दोन कन्यापैकी एकीचे लाँचिगही आगामी निवडणुकीच्या माध्यमातून होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे़

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणElectionनिवडणूक