शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चव्हाणांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही; नाना पटोले यांचा पलटवार

By शिवराज बिचेवार | Updated: April 23, 2024 16:06 IST

लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदार संघात प्रचारात सध्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

नांदेड: मंत्रीपदासाठी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार पडले नसते, असा गौफ्यस्फोट माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी केला होता. त्यावर आज मंगळवारी नाना पटोले यांनी पलटवार करत अशोकराव चव्हाण यांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही. त्यांचे सर्व काही मी बाहेर काढेन, पक्षाचा त्यांनी स्वतः साठी वापर केला. राज्यात काय पाप केले? याची जंत्री माझ्याकडे आहे असा आरोप केला.

लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदार संघात प्रचारात सध्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मंगळवारी नाना पटोले म्हणाले, अशोकराव चव्हाण हे बांधकाम मंत्री असताना त्यांच्याकडे नोटा छापायची मशीन होती. ती बंद पडली त्याचा त्रास अशोक चव्हाणांना होत आहे. सत्तेचा स्वत:साठी फायदा करणाऱ्या अशोकराव चव्हाणांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही. ज्या काँग्रेसमध्ये राहिले, त्याच काँग्रेसमधील लोकांना हरविण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. त्यांनी काँग्रेसबद्दल बोलू नये. त्यांची अंडे-पिल्ले बाहेर काढण्याचे औषध माझ्याकडे आहे, असा दावाही पटोले यांनी गेला.

चव्हाण विरोधातील जंत्री माझ्याकडे भाजपाच्या आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत अशोकराव चव्हाणांचा कच्चाचिट्ठा वाचून दाखविला होता. त्यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे आहे. ते कसं कमीशन खातात याची माहिती आहे. त्यांनी राज्यात काय पाप केले, याची मोठी जंत्री आहे. ज्या पक्षात राहतात तिथेच खड्डा करतात. भाजपात काय खड्डा केला हे निकालानंतर सर्वांना कळेल असा आरोपही नाना पटोले यांनी केला.

टॅग्स :nanded-pcनांदेडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४