शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संगतीचा परिणाम, हायचे होते अधिकारी पण अडकला खुनाच्या गुन्ह्यात

By शिवराज बिचेवार | Updated: September 4, 2022 18:58 IST

स्पर्धा परिक्षेची तयारी करुन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असलेला तरुण वाईट संगतीमुळे खूनाच्या गुन्ह्यात अडकला.

नांदेड :  स्पर्धा परिक्षेची तयारी करुन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असलेला तरुण वाईट संगतीमुळे खूनाच्या गुन्ह्यात अडकला. त्यामुळे त्याची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे. अधिकारी होण्याचे त्याचे अन् कुटूंबियांचे स्वप्नही भंगले आहे.

शहरातील ढवळे कॉर्नर भागात असलेल्या वाईन शॉप व्यवस्थापकाचा गुरुवारी रात्री खून करण्यात आला होता. साईनाथ इंगळे हा वाईन शॉपवर ट्युबर्ग ब्रॅण्डची बिअर आणण्यासाठी गेला होता. यावेळी व्यवस्थापक माधव वाकोरे यांनी या ब्रॅण्डची बिअर नसल्याचे त्याला सांगितले. त्यामुळे चिडलेल्या इंगळे याने वाईन शॉप बंद करुन टाका असा वाद घातला. त्यानंतर तो परत गेला. परंतू थोड्याच वेळा आपल्या अन्य साथीदारांना घेवून तेथे आला.

यावेळी मारहाण करीत व्यवस्थापक वाकोरे यांना भोसकण्यात आले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी साईनाथ सुभाष इंगळे (रा. दत्तनगर), उमेश सुभाष इंगळे आणि बालाजी मारोतराव कुरुडे या तिघांना अटक केली, तर इतर आरोपी पसार झाले होते. शनिवारी रात्री शैलेश रामनाथ अवधूतवार आणि अतुल धोंडीबा धर्मापुरीकर या दोघांना अटक केली आहे. या गुन्ह्यात एकूण आठ आरोपींचा समावेश होता. आता उर्वरित तिघांचा शोध सुरु आहे. दरम्यान, संबंधीत वाईन शॉप हे खासदार चिखलीकर यांचा पुतण्या तथा माजी नगरसेवक संदीप चिखलीकर यांच्या मालकीचे आहे. तर मयत वाकोरे हे त्यांचे नातेवाईक आहेत.

धर्मापुरीकर करीत होता स्पर्धा परिक्षेची तयारीअतुल धर्मापुरीकर हा तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. त्याला मित्राकडून फोन आला. ढवळे कॉर्नर येथे राडा झाला. तो लगेच त्या ठिकाणी धावला. त्याचवेळी व्यवस्थापकाचा खून झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अतुल आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याऐवजी तो थेट तुरुंगात पोहोचला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी