शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

खुनातील फरार आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:56 IST

हस्सापूर शिवारात खून करुन प्रेत गोदावरीच्या पात्रात फेकणाऱ्या दोनपैकी एका आरोपीला पकडण्यात इतवारा पोलिसांना यश आले आहे़ या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ हा आरोपी मरघाट परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना खब-याकडून मिळाली होती़

नांदेड : हस्सापूर शिवारात खून करुन प्रेत गोदावरीच्या पात्रात फेकणाऱ्या दोनपैकी एका आरोपीला पकडण्यात इतवारा पोलिसांना यश आले आहे़ या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ हा आरोपी मरघाट परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना खब-याकडून मिळाली होती़१३ नोव्हेंबर रोजी हरमिंदरसिंघ भोसीवाले या युवकाचा गोदावरी नदीपात्रात मृतदेह आढळून आला होता़ या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी बालाजी भंगारेला पकडले होते़ तर किरण माने आणि आतिष जाधव हे दोघे जण फरारच होते़ शुक्रवारी रात्री हे दोन्ही आरोपी नांदेडात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती़ त्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने त्यांचा पाठलागही केला़ परंतु, ते सापडले नाहीत़ त्यानंतर इतवारा पोलीस ठाण्याचे उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील, पोनि़ साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि नंदकिशोर साळुंके, पोउपनि सूर्यवंशी, पोहेकॉ़ बाबर, जी़ एच़ जाधव, विक्रम वाकडे, कालरा, नागरगोजे यांनी मरघाट शिवारातून किरण माने याच्या मुसक्या आवळल्या़ तर यावेळी आशिष जाधव पळून जाण्यात यशस्वी झाला़ शस्त्र बाळगल्याप्रकरणी किरण माने याच्याविरोधात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ खुनातील फरार असलेल्या या दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी नांदेड ग्रामीण आणि इतवारा पोलिसांमध्ये चढाओढ लागली होती़ त्यात इतवारा पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळत सरशी मिळविली़चोरट्याकडून बारा मोबाईल जप्तइतवारा भागात मोबाईल लंपास करणा-या एका चोरट्याला पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून ४४ हजार रुपये किमतीचे १२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत़ शहरात मोबाईल चोरीच्या घटना दररोज घडत आहेत़ परंतु, मोबाईलचोरटे मात्र पोलिसांच्या हाती लागत नव्हते़ इतवाराच्या गुन्हे शोध पथकाचे पोउपनि नंदकिशोर सोळुंके यांनी संशयित आरोपी गौसखान नईम खान (रा़हिलालनगर) याला अटक करुन न्यायालयात हजर केले होते़ न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती़ पोलीस कोठडीत आरोपीने चोरीची कबुली दिली असून त्याच्याजवळील ४४ हजार रुपये किमतीचे मोबाईल जप्त केले़

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीस