शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारानंतर खून करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:29 IST

नात्यातील महिलेला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्यानंतर खून करणा-या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे़ हा आरोपी पुसद येथे पळून गेला होता़

ठळक मुद्देकिनवटची घटना आरोपीच्या पुसद येथून आवळल्या मुसक्या

नांदेड : नात्यातील महिलेला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्यानंतर खून करणा-या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे़ हा आरोपी पुसद येथे पळून गेला होता़किनवट तालुक्यात मांडवा रस्त्याच्या कडेला असलेल्या एका नाल्यात मुक्ता इंगळे या महिलेचा मृतदेह २३ फेब्रुवारी रोजी सापडला होता़ किनवट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली असता मुक्ता इंगळे यांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे दिसून आले़ महिलेची ओळख पटल्यानंतर माधव विठ्ठल इंगळे यांच्या तक्रारीवरुन किनवट पोलीस ठाण्यात अत्याचारासह खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता़ या प्रकरणात पोलीस अधीक्षक संजय जाधव, पोनि़ सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद दिघोरे, सदानंद वाघमारे यांच्या पथकाने तपास सुरु केला होता़ दिघोरे यांना आरोपीची खब-याकडून माहिती मिळाली़त्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर धनाजी इंगळे (वय २१, रा़लोहरी ता़पुसद ) याला अटक केली़ सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देणा-या ज्ञानेश्वर याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली़मयत मुक्ता व आरोपी ज्ञानेश्वर हे दोघे नगर जिल्ह्यात राजनंदगाव येथील अशोक आलेकर यांच्या शेतावर कामावर होते़ त्यावेळी मुक्ता हिने आरोपी ज्ञानेश्वरचे २५ हजार रुपये चोरले होते़ यातून त्यांचा वाद झाला होता़मुक्ता हिने नंतर ज्ञानेश्वरला जत्रेसाठी बोलावून घेतले होते़ मुक्ता, ज्ञानेश्वर यांनी मुक्ताची मुलगी पायल हिला शाळेत सोडले़ त्यानंतर ज्ञानेश्वर याने जंगलात नेवून मुक्तावर अत्याचार केला़ त्यानंतर तिचा खून करुन प्रेत रस्त्याच्या कडेला टाकले़ ज्ञानेश्वरला पोलीस कोठडी सुनावली आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसCrime Newsगुन्हेगारी