शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

नांदेडमध्ये रबीचे क्षेत्र दुपटीने वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 18:16 IST

२ हजार ३५ हेक्टरवर गहू, हरभरा आणि ज्वारीची पेरणी

- श्रीनिवास भोसले

नांदेड : परतीचा पाऊस जोरदार झाल्याने सर्व नदी-नाल्यांसह विहिरींना पाणी आले असून जमिनीतील पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे़ त्यामुळे यंदा रबीच्या पेरणीक्षेत्रात दुपटीने वाढ होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला.आजपर्यंत जिल्ह्यात २ हजार ३५ हेक्टरवर पेरणी झाली आहे़ 

नांदेड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसासह आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली़ परिणामी, ऐन पावसाळ्यात ज्या विहिरींना पाणी आले नाही त्या विहिरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भरल्या आहेत़ सर्वच विहिरी आजघडीला तुडुंब भरलेल्या आहेत़ त्यामुळे हळद व इतर पिकांना पाणी कमी लागेल़ परिणामी, गहू, हरभरा आणि रबीत इतर पिकांना आवश्यकतेनुसार पाणीपाळ्या मिळू शकतात़ त्यामुळे यंदा रबीमध्ये हरभरा आणि गव्हाचे पेरणीक्षेत्र वाढण्याची शक्यता आहे़ आजघडीला रबीच्या पेरण्यांना प्रारंभ झाला आहे़ नांदेड जिल्ह्यात ९० हेक्टरवर ज्वारी तर २५० हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे़ त्यापाठोपाठ मुदखेडमध्ये १० हेक्टर गहू, २५ हेक्टर हरभरा, नायगाव - २० हेक्टर ज्वारी, ८० हेक्टर हरभरा, बिलोली तालुका - ३० हेक्टर ज्वारी, ३५० हेक्टर हरभरा, धर्माबाद - १० हेक्टर ज्वारी, ४०० हेक्टर हरभरा पिकाची पेरणी झाली आहे़ नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत दोन हजार ३५ हेक्टरवर पेरणी झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे़    

रबीचे तालुकानिहाय सर्वसाधारण क्षेत्र आणि कंसामध्ये प्रस्तावित क्षेत्र हेक्टरमध्ये  नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यात रबीचे सर्वसाधारण क्षेत्र १८ हजार ५१२ हेक्टर असून यंदा २५ हजार ४९६ हेक्टर प्रस्तावित आहे़  अर्धापूर - ५ हजार ५७२ (१९ हजार ५३४), मुदखेड - ५ हजार ७२० (७०००), लोहा - ५ हजार १२१ (७ हजार ४४४), कंधार - ७ हजार ४६५ (२४ हजार ७१८), देगलूर - १० हजार १८८ (२९ हजार १२६), मुखेड - १० हजार ६८९ (२५ हजार ७३१), नायगाव - १२ हजार ४८५ (२३ हजार ७२८), बिलोली -१२ हजार ७५२ (२६ हजार ३२६), धर्माबाद - ४ हजार ७५२ (१७ हजार ५००), किनवट - ५ हजार ३८४ (२३ हजार ५००), माहूर - ३ हजार ६३० (१० हजार ५२४), हदगाव - १३ हजार ६५६ (२८ हजार),  हिमायतनगर - १० हजार ५६२(११ हजार ९६२), भोकर - ५ हजार ९३१ (१० हजार) तर उमरी तालुक्यात ४ हजार २९३ सर्वसाधारण क्षेत्र असून प्रस्तावित क्षेत्र ९ हजार ४५० हेक्टर आहे़ जिल्ह्यात एकूण १ लाख ३६ हजार ७१२ हेक्टर रबीचे सर्वसाधारण क्षेत्र असून यंदा ३ लाख ४९ हेक्टरवर रबीची पेरणी प्रस्तावित आहे़ सदर पेरणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ 

प्रकल्पांतील पाणीसाठ्याने शेतकरी आनंदीनांदेड जिल्ह्यातील बहुतांश गावांना येलदरी आणि इसापूर धरणाचे पाणी मिळते़ सदर प्रकल्पांमुळे नांदेड जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे़ मागील काही वर्षांत दोन्ही प्रकल्प कोरडेठाक राहिल्याने शेतकऱ्यांना केळी, ऊस आदी पिके काढून काढून टाकावी लागली होती; परंतु परतीच्या पावसाने दोन्ही प्रकल्पात मोठा जलसाठा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़ विष्णुपुरी आणि येलदरी प्रकल्प शंभर टक्के भरला आहे तर ऊर्ध्व पैनगंगा इसापूर प्रकल्प ७५ टक्के भरला आहे़ त्यामुळे यंदा सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे़ 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र