शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

माळेगाव यात्रेत आणखी एका अश्वाचा मृत्यू; पशुधन पालक चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 17:41 IST

माळेगाव यात्रेत राज्याच्या वेगवेगळ्या भागांसह उत्तर प्रदेश, राजस्थान येथून घोडे आले आहेत.

- गोविंद कदम लोहा: माळेगाव यात्रेत जवळपास १५० घोड्यावर आता पर्यंत तपासणी व उपचार झाले आहेत. घोड्याच्या दैनंदिन चारा पाणी यात बदल झाला की त्याला  वेगवेगळ्या व्याधी होत असतात. दरम्यान, यात्रेत मंगळवारी आणखी एका घोड्याचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एका बड्या नेत्यांचा हा घोडा होता त्याची अंदाजे किंमत तीन लक्ष रुपये होती असे सांगण्यात येत आहे . घोड्याच्या मृत्यूबाबत पशुधन अधिकारी डॉ. पुरी यांनी दुजोरा दिला आहे. 

माळेगाव यात्रेत राज्याच्या वेगवेगळ्या भागांसह उत्तर प्रदेश, राजस्थान येथून घोडे आले आहेत. घोड्याच्या उपचार व वैद्यकीय देखभालीसाठी पशु संवर्धन विभागाची २४ तास टीम माळेगाव यात्रेत कार्यरत आहे. चार दिवसांपूर्वी यात्रेत एक अश्व दुषित पाण्यामुळे दगावला होता. त्याबद्दल मोठी ओरड सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बडे प्रस्थ माजी मंत्री स्व. कुंटुरकर यांचा घोडा दरवर्षी यात्रेत येत असतो. राजेश कुंटुरकार यांची राहुटी आहे.  त्यांच्या अश्वास आजार झाल्याने तज्ज्ञ पशुधन अधिकारी यांनी उपचार सुरु केले. पण अखेर मंगळवारी हा घोडा दगावला, असे पशुधन अधिकारी डॉ एम आर पुरी यांनी सांगितले. डॉ. जी. जी. हावडे (पथक प्रमुख) फो पी पी हक्के (पथक प्रमुख) पशुधन विकास अधिकारी डॉ अरविद दगडे, डॉ सतीश केंद्रे , ज्ञानेश्वर नखाडे, जकवाड , मिलिंद उखाडे, गणेश धाकतोंडे अशी टीम अहोरात्र घोड्याच्या देखरेखीसाठी आहे. जवळपास दीडशे घोड्यांवर उपचार करण्यात येत आहेत. 

अश्व पालकांनी घ्यावयाची काळजीयात्रा काळात अश्वाचा जो दैनंदिन चारा आहे यात बदल करु नये. काठेवाडी वा अन्य घोडे जे की उत्तर प्रदेश, राजस्थान तसेच इतर भागातील घोडे येतात त्याचे मालक या घोड्यांच्या चारा-,पाण्यात बदल करीत नाहीत. वाहतुकी दरम्यान काळजी घ्यावी. नियमीत जंतनाशक औषधीचा वापर करणे आवश्यक आहे. वातावरणाच्या बदलामुळे यात्रेत चारा कमी खाणे किंवा पाणी कमी किंवा न पिणे याबाबी घडल्यास पोटशुळ होउ शकते. त्यामुळे घोड्यांसाठी  जो नियमीत चारा आहे तो सोबत घेवून तोच चारा देणे आवश्यक आहे. लिवर टॉनीक किंवा वाहतुक ताण कमी करण्यासाठी औषधी वापर करण्यात यावा असे पशुधन विकास अधिकारी डॉ एम आर पुरी यांनी सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडAgriculture Sectorशेती क्षेत्र