नांदेड- शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या १०५४ अहवालांपैकी २६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २० हजार ५१६ एवढी झाली आहे. तर मागील २४ तासात, ४२ जणांनी कोरोनावर मात केल्याने आजवर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १९ हजार ४३६ एवढी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयात ३३६ बाधितांवर उपचार सुरु आहेत. यातील १५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. दरम्यान मागील २४ तासात एकाही रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला नाही. आजवर जिल्ह्यात ५५० जणांचा कोरोनाने बळी घेतलेला आहे.
नांदेडमध्ये आणखी २६ बाधित आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:28 IST