शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

अमित भारद्वाजच्या पोलीस कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:28 IST

गेन बिटकॉईनच्या माध्यमातून नांदेडकराना जवळपास १०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाज यांच्यासह महाराष्ट्रातील एजंट हेमंत सूर्यवंशी या दोघांना नांदेड न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते़ यावेळी नांदेड पोलिसांनी भारद्वाज हा तपासात असहकार्य करीत असल्याचा मुद्दा उपस्थित करीत कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती़ त्यानंतर न्यायालयाने भारद्वाजच्या कोठडीत २१ मे पर्यंत वाढ केली आहे़

ठळक मुद्देबिटकॉईन प्रकरण : तपासात असहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड :गेन बिटकॉईनच्या माध्यमातून नांदेडकराना जवळपास १०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाज यांच्यासह महाराष्ट्रातील एजंट हेमंत सूर्यवंशी या दोघांना नांदेड न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते़ यावेळी नांदेड पोलिसांनी भारद्वाज हा तपासात असहकार्य करीत असल्याचा मुद्दा उपस्थित करीत कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती़ त्यानंतर न्यायालयाने भारद्वाजच्या कोठडीत २१ मे पर्यंत वाढ केली आहे़व्हर्चुअल करन्सी म्हणजेच अदृश्य चलनाचे मायाजाल देशभर पसरले आहे़ या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज याने स्वत:ची गेन बिटकॉईन ही कंपनी स्थापन केली होती. आपल्या ओळखीचा फायदा घेत त्याने नांदेडमध्ये जवळपास १७५ बिटकॉईन गोळा केले होते़ त्याबदल्यात आकर्षक व्याज देण्याचे आमिष त्याने दिले होते. परंतु, त्यानंतर त्याने परतावा देण्याच्या बदल्यात बाजारात अतिशय कमी मूल्य असलेले एम कॅप हे चलन गुंतवणूकदारांना दिले.नांदेडमध्ये आतापर्यंत अमित भारद्वाज याने ५ लाख रुपये किमतीचे तब्बल १७५ बिटकॉईन गुंतवणूकदाराकडून घेतले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारद्वाज याला दिल्ली विमानतळावर पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी भारद्वाज याच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले. नांदेड पोलिसांनी ९ मे रोजी अमित भारद्वाज व महाराष्ट्रातील एजंट हेमंत सूर्यवंशी या दोघांना ताब्यात घेतले होते़१० मे रोजी न्यायालयाने या दोघांनाही १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ शुक्रवारी या दोघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते़ यावेळी पोलिसांनी अमित भारद्वाज हा तपासात सहकार्य करीत नसल्यामुळे कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती़ न्यायालयाने हा मुद्दा ग्राह्य धरत भारद्वाजच्या कोठडीत २१ मे पर्यंत वाढ केली़ तर हेमंत सूर्यवंशी याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून नांदेड पोलीस त्याला घेवून पुण्याकडे रवाना झाले आहेत़

टॅग्स :NandedनांदेडBitcoinबिटकॉइनNanded policeनांदेड पोलीसonlineऑनलाइन