शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

दुष्काळाच्या समस्येवर सर्वांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:20 AM

मराठवाड्यातील दुष्काळाची समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन जनतेला मदतीचा दिलासा देऊ या, असे आवाहन पर्यावरणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.

ठळक मुद्देपालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण

नांदेड : मराठवाड्यातील दुष्काळाची समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन जनतेला मदतीचा दिलासा देऊ या, असे आवाहन पर्यावरणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथील पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री कदम यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. पालकमंत्री कदम म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमुळे आपल्या सर्वांना जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले, हे विसरुन चालणार नाही. महामानवाचे समाजावर अनंत उपकार आहेत, अशी आठवण करुन देत ज्यांनी-ज्यांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या या आठवणीबरोबर त्यांना दु:ख होईल असे काम आपल्या हातून होणार नाही, याची दक्षता प्रत्येकांनी घेतली पाहिजे. आपण एकमेकांपासून विखुरले जाऊ नये, त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगत होते पोटाला जातीचे कव्हर लावू नका, जे पोट रिकामे आहे ते कुठल्याही जाती, धर्माचे असो ते पोट भरले पाहिजे. तीच भावना सरकारची आहे. आम्ही सर्वजण एक आहोत हे राष्ट्रीय सणातील घोषणेपुरते मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने आपण एका कुटुंबातील, एका रक्ताचे, भारतीय आहोत, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजणं गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.यावेळी कदम यांच्या हस्ते जानापुरी येथील शहीद जवानांच्या वीरपत्नी श्रीमती शीतल संभाजी कदम यांना लोहा तालुक्यातील खरबी येथील २ हेक्टर जमिनीचा जिल्हाधिकारी यांचा आदेश सन्मानपूर्वक देण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, महापौर शीलाताई भवरे, आ़ अमर राजूरकर, आ़ डी. पी. सावंत, आ़ अमिताताई चव्हाण, आ़ हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी उपस्थित होते.केंद्रीय राखीव पोलीस बल मुदखेड, राज्य राखीव पोलीस बल हिंगोली, सशस्त्र पोलीस पथक (क्यूआरटी), सशस्त्र पोलीस पथक (पोलीस मुख्यालय), पुरुष गृहरक्षक दल पथक, शहर वाहतूक शाखा पथक, महिला गृहरक्षक दल पथक, अग्निशमन दल, एनसीसी मुलांचे पथक (सायन्स महाविद्यालय) , महात्मा फुले हायस्कूल स्काऊट मुले पथक, चक्रवर्ती अशोक विद्यालय पळसा पथक, श्री दत्त हायस्कूल तळणी पथक, पोलीस बँड पथक, श्वानपथक, बॉम्बशोधक व नाशक पथक, मार्क्स मॅन क्यूआरटी, वज्र वाहन (दंगा नियंत्रण), बुलेट रायडर, मिनी रेस्क्यू फायर टेंडर, १०८ रुग्णवाहिका यांनी संचलन केले.

टॅग्स :NandedनांदेडRamdas Kadamरामदास कदमRepublic Dayप्रजासत्ताक दिन