शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका सभापतीपदासाठी सर्वच सदस्य इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 20:04 IST

स्थायी समितीच्या पंधराही सदस्याने घेतले नामनिर्देश अर्ज

ठळक मुद्देअशोक चव्हाणच ठरविणार सभापती

नांदेड : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. सोमवारी नामनिर्देशनपत्र घेण्याच्या मुदतीत स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी नामनिर्देशनपत्र घेतले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे स्थायी समितीवरील सर्वच सदस्य या पदासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

स्थायी समितीवरील आठ सदस्यांचा कार्यकाळ १ डिसेंबर रोजी संपला आहे. त्यामध्ये स्थायी समितीचे सभापती फारुख अली खान यांचाही समावेश होता. त्यामुळे नव्या सभापती निवडीचा कार्यक्रम विभागीय आयुक्तांनी घोषित केला आहे. रिक्त झालेल्या आठपैकी सात जागेवर काँग्रेसचे सदस्य निवडण्यात आले आहेत.

स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक २६ डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी २३ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्र देण्यात आले. नामनिर्देशनपत्र घेण्यासाठी एकच दिवस होता. या कालावधीत काँग्रेसच्या ज्योती किशन कल्याणकर, करुणा कोकाटे, दयानंद वाघमारे, राजेश यन्नम, पूजा पवळे, अ. रशीद अ. गणी, फारुख हुसेन, श्रीनिवास जाधव, अपर्णा नेरलकर, ज्योती रायबोले, नागनाथ गड्डम, बापूराव गजभारे, अमितसिंह तेहरा, दीपाली मोरे आणि शबाना बेगम या स्थायी समितीवरील १५ सदस्यांचा समावेश आहे.

अशोक चव्हाणच ठरविणार सभापतीसभापतीपदासाठी काँग्रेसचे सर्व सदस्य इच्छुक असले तरी या पदासाठी काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे ज्यांचे नाव सुचवतील तोच उमेदवार उमेदवारी दाखल करेल, हे निश्चित आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता स्थायी समिती व महापालिकेत काँग्रेसकडून चव्हाण ज्या नावाला पसंती देतात तोच उमेदवार अर्ज भरतो. त्यामुळे स्थायी समिती सभापतीपदासाठी २४ डिसेंबर रोजी अर्ज भरले जाणार आहेत. या पदासाठी चव्हाण हे कुणाला संधी देतात? हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाcongressकाँग्रेसNandedनांदेड