शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांनंतर कारखान्यांचे बॉयलर झाले थंड, उसतोडणी उशिरा झाल्याने शेतकऱ्यांना फटका

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: April 4, 2024 17:37 IST

चार जिल्ह्यांतील ऊस गाळप संपले, १ कोटी १९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

नांदेड : नांदेड विभागात ५ ते १० नोव्हेंबरपासून सुरू झालेले सहकारी व खासगी अशा नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतील २९ साखर कारखान्यांचे बॉयलर अखेर पाच महिन्यांनंतर थंड झाले आहे. ऊसगाळप संपले असून, मार्च महिन्याअखेरीस सर्व कारखान्यांनी १ कोटी १७ लाख १२ हजार ६५३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यातून १ कोटी १९ लाख ८३,१०५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

नांदेड विभागासह मराठवाडा तसेच राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम जवळपास संपलेला आहे. त्यामुळे नांदेड सहसंचालक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील कारखान्यांचे बॉयलर बंद झालेले आहेत. गेल्या वर्षी नांदेड विभागात उसाची लागवड उशिराने झाली होती. तसेच तोडणीवेळी अवकाळी पाऊस बरसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस शिल्लक राहिल्याने यंदा मार्चअखेरपर्यंत कारखाने सुरू राहिले. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे ऊसतोडणीसाठी शेतात वाहने जात नसल्याने अडचणी आल्या होत्या. त्यामुळे ऊस गाळप सुरू होण्यास बराच विलंब झाला होता. यामुळे शेतातील ऊस बरेच दिवस पडून राहिल्याने शेतकऱ्यांची ओरड सुरू राहिली. तोडणीला येऊनही अनेक दिवस ऊस शेतातच राहिल्याने त्याचा एकरी उत्पादनावर परिणाम झाला. एकरी ४० टन ऊस व्हायचा तिथे २५ ते ३० टनावर उतारा आला.

लातुरमध्ये सर्वाधिक ४९ लाख मे.टन ऊस गाळप२०२३-२४ या हंगामात लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सर्वाधिक ४९ लाख ५ हजार ९५४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तर त्यातून ५२ लाख २२ हजार ९३० क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आले आहे. त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यातील १९ लाख ४१ हजार ९३७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, १९ लाख ३२ हजार ६३५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. तर परभणी जिल्ह्यातील सात खासगी साखर कारखान्यांनी ३३ लाख ३५ हजार ५४५ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, ३३ लाख ६८४० क्विंटल साखरेचे उत्पादन निघाले आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी १५ लाख २९ हजार २१८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून त्यातून १५ लाख २० हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन निघाले आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक फटकाजिल्ह्यात यंदा ऊसलागवड जास्त आणि गाळप उशिराने सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस अनेक दिवस तोडणीअभावी शेतातच शिल्लक राहिला होता. काही शेतकऱ्यांनी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात लागवड केलेल्या उसाची तोडणी पंधरा ते सोळा महिन्यांनंतर झाली. त्यामुळे उसाच्या वजनामध्ये मोठी घट झाल्याने त्याचा शेतकऱ्यांना फटका मोठा आर्थिक फटका बसला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेNandedनांदेड