शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

भोकरमध्ये ४४ वर्षानंतर होतेय चव्हाण-गोरठेकरांमध्ये लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 20:42 IST

भोकरमध्ये पुन्हा इतिहास घडवा; अशोक चव्हाण यांचे आवाहन 

नांदेड : भोकर मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर १९७५ मध्ये शंकरराव चव्हाण यांच्याविरोधात बाबासाहेब गोरठेकर उभे टाकले होते. त्या निवडणुकीत शंकरराव चव्हाणांना सामान्य जनतेने साथ देत विजयी केले होते. ४४ वर्षानंतर या मतदारसंघात पुन्हा इतिहास घडवायचा आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.

भोकर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ मंगळवारी नागापूर, पोमनाळा, कामणगाव, हाडोळी, निवघा, माळकौठा आदी भागांत प्रचारसभा झाल्या. यावेळी सुभाष किन्हाळकर, बाळासाहेब रावणगावकर, सुभाष कोळेगावकर, राजू दिवसीकर, सुरेश बिल्लेवार, उद्धव केसराळे, आनंद पाटील आदींची उपस्थिती प्रमुख होती. माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, भाजप सरकार रस्त्यावरील खड्डे बुजवू शकत नाही, ते सरकार काय चालवू शकेल? कर्जमाफी नाही, पीकविमा नाही, बेरोजगारांना काम नाही. अशा अवस्थेत हे सरकार चालत आहे. भाजपने जिल्ह्याचा काय विकास केला हे विरोधी पक्षाने सांगावे, असेही ते म्हणाले. भोकर मतदारसंघातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. 

भोकरमध्ये पूर्वी २० हजार लोकांसाठी टँकरने पाणी पुरवले जात होते. मात्र, आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रत्येक घरात नळाला पाणी आले. भोकरचा विकास कधीही थांबू देणार नाही, असेही चव्हाण    यांनी यावेळी सांगितले. या सभांमध्ये दत्तराव मोळके, बालाजी सानपवार आदींनी भाजपा सरकारवर टीका केली. मोदींच्या नोटबंदी निर्णयामुळे सामान्य जनता कोलमडली. अनेक लघुउद्योग बंद पडले. जनधनमध्ये १५ लाखांचे आमिष केंद्र सरकारने दाखविले तर राज्यात फडणवीस सरकारने सातबारा कोरा करण्याची फसवी घोषणा केली. या फसव्या सरकारला आता पुन्हा सत्तेवार आणण्याची चूक करु नका, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या सभेला अ‍ॅड. शिवाजीराव कदम, उज्ज्वला देसाई, गंगाधर पाटील, गणपत जोंधळे, केशव गोडबोले, प्रकाश बच्चेवार, दत्तात्रय सोळंके, सुभाष पिठ्ठेवाड, गजानन गोडबोले, माधव पोमनाळकर, साईनाथ सोळंके, गंगाराम सोळंके आदींची उपस्थिती होती.

गोल्लेवार समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकारच्चव्हाण यांच्या उपस्थितीत भोकर येथे गोल्ला-गोल्लेवार समाजाचा मेळावा घेण्यात आला. गोल्ला-गोल्लेवार समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आतापर्यंत आपणच पुढाकार घेतला आहे. आपण श्रीकृष्णाचे भक्त असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपने गोल्ला-गोल्लेवार समाजाचे मते खराब करण्यासाठी गोल्ला-गोल्लेवार समाजाचा उमेदवार दिला आहे. हा उमेदवार यापूर्वी भाजपामध्ये होता. हे सर्वजण जाणतात. ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत वंचितने १ लाख ६७ हजार मते वाया घातली. त्यासारखाच प्रयोग भोकरमध्ये होत असून तो प्रयोग हाणून पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी            आ. अंजली निंबाळकर, मारोतराव बल्लाळकर, प्रा. गणेश अटकमवार, संजू आऊलवार, आनंदराव गादिलवार, मारोतराव संपलवार, राम भटकमवार, रामेश्वर जागेमवार आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019bhokar-acभोकरAshok Chavanअशोक चव्हाण