शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

तब्बल २४ वर्षाच्या खंडानंतर भीमराव केरामांच्या गळ्यात आमदारकीची माळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 13:02 IST

भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर १९९३ मध्ये होते आमदार

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या प्रदीप नाईकांना कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका वंचितच्या उमेदवाराचाही झटका

किनवट : भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर १९९३ मध्ये आमदार म्हणून निवडून आलेले भीमराव केराम यांच्या गळ्यात तब्बल २४ वर्षानंतर पुन्हा आमदारकीची माळ पडली आहे़ दुसरीकडे, राष्ट्रवादीचे उमेदवार तथा आमदार प्रदीप नाईक यांना काही कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका बसला़ वंचित आघाडीचे डॉ़ हमराज उईके यांची उमेदवारीही नाईक यांना भोवली़

भाजपाने ऐनवेळी भीमराव केराम यांना उमेदवारी जाहीर करून इच्छुकांच्या तयारीवर पाणी फेरले होते़ इच्छुक केराम यांचा प्रचार करतील की नाही, असे वातावरण असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या किनवट येथे झालेल्या सभेनंतर महायुतीच्या सर्वच असंतुष्टांनी केराम यांचा इमानेइतबारे प्रचार केला़ मु्ख्यमंत्र्यांच्या सभेनंतर सर्वांचे मनोमिलन झाले़ प्रदीप नाईक विरूद्ध इतर सर्व अशी लढत चर्चेला आली़ झालेही तसेच़ पद नसतानाही तळागाळातील लोकांच्या समस्यांसाठी झगडणारे भीमराव केराम लोकांच्या चांगलेच नजरेत राहिले़ मतदारांनी केराम यांना उत्स्फूर्तपणे मतदान केले़

दुसरीकडे अनेक कार्यकर्ते नाईकांच्या भरवशावर गुत्तेदार म्हणून मोठे झाले़ अशापैकी काहींनी दगा दिला़ काही लोकप्रतिनिधींना आपले गट व गण शाबूत ठेवता आले नाहीत़ मित्रपक्ष काँग्रेसचे कार्यकर्तेही प्रचारापासून चार हात दूर राहिले़ ही बाबही नाईक यांना भोवली़ आमदार चांगला, कार्यकर्ते बरोबर नाहीत ही लोकांची भूमिकाही नाईकांना भोवली़ 

भीमराव केराम यांना मिळालेली मते : 88,881    पराभूत उमेदवार    पक्ष    मिळालेली मते२    जाधव प्रदीप नाईक    राष्ट्रवादी काँग्रेस    ७५,१३८३    विनोद राठोड    मनसे    ९८९४    संदीपभाऊ निखाते    बहुजन समाज पार्टी    ३३९५    अडकिणे संतोष माधव    बहुजन मुक्ती पार्टी    ३८८६    मिरची महाराज धर्मादास त्रिपाठी    जयजवान पार्टी    ३१२७    विशाल दत्ता शिंदे    संभाजी ब्रिगेड पार्टी    ३१४८    शादुल्ला शेख अहमद    बळीराजा पार्टी    २८५९    प्रो़डॉ़हमराज उईके    वंचित बहुजन आ़    ११,५८०१०    अ‍ॅड़प्रदीप देवा राठोड    अपक्ष    ७८९

विजयाची तीन कारणे...1संघ परिवार, भाजपा, शिवसेना व भीमराव केराम यांच्या चाहत्यांनी नियोजनबद्ध प्रचार केला़ हिंदुत्ववादी मते खेचण्यात केराम यांना यश आले़ 2वंचितचे हेमराज उईके यांची उमेदवारीही केराम यांच्या विजयाला हातभार लावून गेली़ 3माहूर व किनवट तालुक्यातील मतदारांत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबद्दल असलेली नाराजी प्रदीप नाईक यांना भोवली़ त्यामुळेच १५ वर्षानंतर किनवट मतदारसंघात कमळ फुलले़ 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kinwat-acकिनवटNandedनांदेड