शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अन्नात भेसळ केली, चार दुकानांवर फौजदारी खटले

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: February 8, 2024 19:05 IST

अन्न औषध प्रशासनाने नऊ महिन्यांत घेतले २५८ अन्न नमुने

नांदेड : जिल्ह्यात अन्न व प्रशासन विभागाकडून १ एप्रिल २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान वेगवेगळ्या ५९२ आस्थापनांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यात एकूण अन्न नमुन्यांचे २५८ सॅम्पल घेण्यात आले. त्यापैकी ४६ सॅम्पल चांगले निघाले, तर ४ नमुने असुरक्षित, ९ कमी दर्जाचे, एक मिस ब्रँडिंग आढळून आला. तपासणीदरम्यान २४ आस्थापनांमध्ये अस्वच्छता आढळून आल्याने त्यांच्याकडून १ लाख ९४ हजारांचा दंड वसूल केला आहे, तर २० आस्थापनांचे प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले असून चार आस्थापनांवर फौजदारी खटले दाखल केले आहेत.

याशिवाय अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर २४ कारवाया केल्या असून, त्यांच्याकडून दोन वाहने जप्त केली, तर २० दुकाने सील करण्यात आली आहेत. संबंधितांकडून ३६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न औषध प्रशासनाकडून ३१ डिसेंबरला २१ ते ३१ डिसेंबरदरम्यान तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कालावधीत २८ आस्थापनांची तपासणी करून १५ आस्थापनांचे नमुने घेण्यात आले. या नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहेत. तसेच १ ॲागस्ट ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालाधीत ४२ दूध नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ५ कमी दर्जाचे, २ असुरक्षित, तर ९ प्रमाणित आढळून आले, तर २८ नमुने प्रलंबित आहेत.

तेलसाठा जप्तजिल्ह्यात दिवाळी सणानिमित्त राबविण्यात आलेल्या मोहिमेत सात आस्थापनांकडून ५ लाख ६५ हजार ६१२ रुपयांचा तेलसाठा अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील तेल व्यावसायिकाचे धाबे दणाणले.

तक्रार करावीकुठल्याही अन्नपदार्थात भेसळ वाटल्यास संबंधिताने अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे ई-मेलद्वारे किंवा प्रत्यक्ष येऊन तक्रार करावी.-संजय चट्टे, उपायुक्त, अन्न व औषध प्रशासन, नांदेड.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग