शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

टरबुजांवर थंडीचा घाला; केळीचे पीक गेले कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:56 IST

मागील काही दिवसांपासून कमी- जास्त प्रमाणात थंडीची लाट कायम राहिल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील टरबूज व केळी पिकांना फार मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरजनुकसान भरपाईची केली मागणी

अर्धापूर/पार्डी : मागील काही दिवसांपासून कमी- जास्त प्रमाणात थंडीची लाट कायम राहिल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील टरबूज व केळी पिकांना फार मोठा फटका बसला आहे.तालुक्यात गतवर्षांपासून नैसर्गिक संकटामुळे हातातोंडाशी आलेले शेतातील पिके उद्ध्वस्त होत आहेत़ त्यामुळे शेतकºयांना खूप मोठा आर्थिक फटका बसत असून शेतक-यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.गतवर्षी पाऊस कमी प्रमाणात झाला होता़ त्यामुळे तालुक्यात दुष्काळीस्थिती निर्माण झाली़ परिणामी शेतकरी मोठ्या पिकांना फाटा देत लहान पिकाकडे वळले. भाजीपाला व टरबूज पिकाची निवड केली़ या परिसरातील शेतकºयांनी टरबूज पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु, मागील काही दिवसांत सातत्याने थंडीची लाट असल्याने या पिकाच्या वाढीत व फळधारणा वेळी परिणाम दिसून आला. महागड्या औषधीचा प्रयोग केला. फळे बाजारात विक्रीसाठी जाणार तेव्हा थंडीची लाट कायम राहिली़ त्यामुळे भावात मोठी घसरण झाली़या वर्षात पाण्याची कमतरता भासत असल्याने शेतकरी कमी पाण्यावर व कमी दिवसांत येणाºया पिकाची लागवड करत असून त्यात प्रामुख्याने पालेभाज्या व फळपिकाची निवड करीत आहेत. तालुक्यातील निमगाव, कारवाडी, देळूब व पार्डी परिसरात मोठ्या प्रमाणात टरबूज फळाची लागवड केली आहे. हे पीक ९० दिवसांत येते़ भरपूर उत्पादन देणाºया पिकामध्ये टरबुजाचे नाव घेतले जाते. टरबूज पीक सुरुवातीला जोमात होते. जसजशी थंडीची लाट आली तसे पिकावर मोठ्या प्रमाणात रोगराई दिसत होती. शेतक-यांनी मोठ्या मेहनतीवर पीक घेतले. परंतु, मागील काही दिवसांपासून थंडीची लाट कायम असल्याने पिकाची व फळाची वाढ खुंटली आहे़ फळे लहान आकाराचे झाले असून टरबुजाच्या आतील भागात पोकळी निर्माण झाली़ त्यामुळे पिके वजनदार भरत नाहीत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशीच परिस्थिती केळीच्या बागांची दिसत आहे. केळीच्या पानावर पिवळ्या रंगाच्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दुसरीकडे पाने करपून गेल्याने वाढ थांबली आहे. त्यामुळे केळीची बाग कोमात गेल्याचे चित्र आहे.नफ्यासाठी केली टरबुजाची लागवडमाझ्याकडे एक एकर जमिनीत टरबुजाची लागवड केली आहे. लहान मुलांप्रमाणे पिकाची काळजी घेतली. आता तोडणीच्या वेळी थंडी वाढल्याने फळांची वाढ थांबली आहे़ बाजारभावातही मोठी घसरण झाली आहे़ या पिकांवर कर्जाचा डोंगर कमी होईल, अशी आशा होती़ परंतु, तसे चित्र दिसत नाही.- पांडुरंग तरोडकर, शेतकरी (पार्डी)

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीthunderstormवादळ