लोह्यात प्लॅस्टिकचा वापर व विक्री करणाऱ्या सात व्यापाऱ्यांवर कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 07:50 PM2018-06-25T19:50:40+5:302018-06-25T19:51:35+5:30

शहरात प्लॅस्टिक वापर व विक्री करणाऱ्या सात व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

Action on seven merchants that use and sells plastic | लोह्यात प्लॅस्टिकचा वापर व विक्री करणाऱ्या सात व्यापाऱ्यांवर कारवाई 

लोह्यात प्लॅस्टिकचा वापर व विक्री करणाऱ्या सात व्यापाऱ्यांवर कारवाई 

Next

लोहा (नांदेड ) : राज्यभरात लागू झालेल्या प्लॅस्टिक बंदीची नगर पालिकेने कठोर अंमलबजावणी सुरु केली आहे. आज शहरात प्लॅस्टिक वापर व विक्री करणाऱ्या सात व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

नगर पालिकेचे मुख्याधिकारी अशोक मोकले यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरात दिवसभर प्लॅस्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात आली. या मोहिमेत पथक प्रमुख बाबाराव चव्हाण व कार्यालयीन अधिक्षक उल्हास राठोड यांच्या नेतृत्वाखाली पालिकेतील कर्मचारी सहभागी झाले. यावेळी शहरात प्लॅस्टिक वापर व विक्री करणाऱ्या सात व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी ५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे प्लॅस्टिकचा वापर व विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 
 

Web Title: Action on seven merchants that use and sells plastic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.