शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

नांदेडमध्ये वर्षभरात १२ हजाराहून अधिक ट्रिपलसीट दुचाकीस्वारावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 4:28 PM

वाहतुक शाखेच्यावतीने विशेष मोहिम राबविल्याने महाविद्यालय तसेच खासगी कोचिंग क्लासेस परिसरात दुचाकीवर ट्रिपलसीट अथवा नियमबाह्य दुचाकी चालविणार्यांची संख्या घटली.

ठळक मुद्देकारवाईच्या बडग्याने केले जातेय नियमांचे पालन

नांदेड : नांदेड शहर व परिसरात दुचाकी चालकांसह ऑटोचालकांवर नियमितपणे कारवाई मोहिम राबविली जाते. त्यातून वर्षभरात जवळपास १२ हजार दुचाकीस्वारांवर कारवाई केली आहे. वाहतुक शाखेच्यावतीने विशेष मोहिम राबविल्याने महाविद्यालय तसेच खासगी कोचिंग क्लासेस परिसरात दुचाकीवर ट्रिपलसीट अथवा नियमबाह्य दुचाकी चालविणार्यांची संख्या घटली. त्यातूनच महिन्याकाठी १२०० ते १५०० दुचाकीऐवजी आता ६०० ते ८०० दुचाकी तसेच इतर वाहनांवर कारवाई होत आहे. 

नांदेड वाहतूक शाखेच्यावतीने काही दिवसांपूर्वी वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रिपलसीट, बुलेटला आवाजाचे सायलेंसर बसविणे, स्टंट करणे, कट मारणे, फ्ॅन्सी नंबर प्लेट बसविणे अशा दुचाकीस्वारांविरोधात कारवाई मोहिम राबविली होती. यातून लाखो रूपयांचा दंड वसुल करण्यात आला होता. त्याचबरोबर काही तरूणांच्या दुचाकीही जप्त केल्या होत्या. त्यामुळे शहरात नियमबाह्यरित्या दुचाकी चालविणार्यांवर पोलिसांची वचक बसली आहे. परिणामी सध्या ट्रीपलसीट तसेच नियमांचे उल्लंघन करणार्यांची संख्या घटली आहे. मागील दहा महिन्यात वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईत १० हजाराहून अधिक दुचाकीस्वारांकडून जवळपास १५ लाख रूपये दंड वसुल करण्यात आला आहे. त्यात ऑक्टोबर महिण्यात ८५० दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई ही भाग्यनगर, आनंदनगर रस्त्यावर करण्यात आली आहे. 

भाग्यनगर रस्त्यावर ट्रिपल सीट वाहने भरधावभाग्यनगर, आनंदनगर या परिसरात सर्वाधिक प्रमाणात विद्यार्थी राहतात. सध्या कोरोनामुळे संख्या कमी असली तरी दुचाकीवर ट्रीपलसीट जाणे तसेच स्टंट करणे हे प्रकार सुरूच आहेत. त्यात वजिराबाद, गुरूद्वारा चैारस्ता परिसरात रात्रीला दुचाकीस्वार स्टंट करताना आढळून येतात. 

१० महिन्यांत १५ लाख दंड केला वसूल  मागील दहा महिन्याच्या कालावधीत वाहतूक शाखेने जवळपास १५ लाख रूपये दंड वसुल केला. यात दुचाकीवर ट्रीपलसीट, विनापरवाना वाहन चालविणे, कागदपत्रे सोबत न ठेवण, वाहन नो पार्कींगमध्ये लावणे यासह विविध नियमांचे उल्लंघन करणार्यांचा समावेश आहे. 

ऑक्टोबरमध्ये ८५० नागरिकांकडून दंड दुचाकी चालवितांना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर वाहतूक शाखेच्यावतीने ऑक्क्टोबर महिन्यात जवळपास साडेआठशे दुचाकीस्वारांवर कारवाई केली आहे. यामध्ये सर्वाधिक २२० केसेस भाग्यनगर, आनंदनगर या रस्त्यावरील आहेत. सध्या काॉलेज सुरू नसले तरी दुचाकीस्वार सुसाट धावत आहेत. त्यात स्टंटबाजी करणार्या टोळक्यांची संख्या अधिक आहे. तसेच तरोडा नाका, आयटीआय चाैक, वजिराबाद चाैरस्ता या ठिकाणीही नियम तोडणार्या, नो पार्किंग अशा वाहनांवर कारवाई केली जात आहे. 

लायसन्स नसल्यास पाल्यास गाडी देवू नयेट्रीपलसीट सहसा नवतरूण, विद्यार्थी असतात. नियम तोडणारे अथवा ट्रीपलसीट, स्टंट करणारे अशांविरोधात पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात कारवाई करून दंड वसुल केला जातो. पालकांनी लायसन्स नसल्यास पाल्यास गाडी देवू नये, तसेच दुचाकी चालविण्याबाबत योग्य तो समज देवूनच दुचाकी ताब्यात द्यावी.- चंद्रशेखर कदम, पोलीस निरिक्षक

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNandedनांदेड