शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरडीवरील बलात्कार प्रकरणात आरोपीला आजन्म जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 19:25 IST

आरोपीवर बलात्काराचे दोन गुन्हे

ठळक मुद्देहिमायतनगरची घटनादोन्ही प्रकरणात जन्मठेप

नांदेड : हिमायतनगर शहरातील फुलेनगर भागात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार प्रकरणात भोकर न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ १६ मार्च २०१९ रोजी ही घटना घडली होती़ विशेष म्हणजे, आरोपीला अशाच एका घटनेत यापूर्वीच न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती़ 

हिमायतनगरातील फुलेनगर येथे १६ मार्च २०१९ रोजी आरोपी बालाजी मल्हारी देवकते (वय ४३) हा सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास एका सात वर्षीय चिमुकलीला घेवून जात होता़ त्यावेळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बशीर खॉ पठाण यांनी देवकते याला हटकले़ मुलीला कुठे घेवून जात आहे अशी विचारणाही केली़ त्यावर आरोपी देवकते याने मुलगीच माझ्या पाठीमागे येत असल्याचे उत्तर दिले़ त्यानंतर मुलीला घेवून आरोपी देवकते शेतात पोहोचला़ या ठिकाणी आरोपी देवकते याने सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला़ या प्रकरणात पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन हिमायतनगर पोलीस ठाण्यात बालाजी देवकते याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता़

या प्रकरणाचा खटला भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात चालला़ सरकार पक्षाच्या वतीने दहा साक्षीदार तपासण्यात आले़ सबळ साक्षी- पुराव्याच्या आधारे न्या़ एम़ एस़ शेख यांनी आरोपी बालाजी देवकते याला मरेपर्यंत जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड़ रमेश राजूरकर यांनी बाजू मांडली़ पोउपनि डी़ एस़ काळे यांनी तपास केला़ तर काकडे यांनी पैरवी अधिकारी म्हणून मदत केली़ 

बाललैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हेआरोपी बालाजी देवकते याच्याविरोधात हिमायतनगर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल आहेत़ त्यातील पहिल्या खटल्यात भोकर न्यायालयाने देवकते याला मरेपर्यंत जन्मठेप आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला होता़ त्यानंतर मंगळवारी झालेल्या दुसऱ्या खटल्याच्या सुनावणीत आरोपी देवकते याला मरेपर्यंत जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे़

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीNandedनांदेड