शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडीट सोसायटीच्या बोगस शाखा काढून गंडा घालणारे आरोपी तीन महिन्यापासून मोकाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 19:11 IST

पिडीतानांच पोलिसांकडून सबुरीचे सल्ले मिळत असल्याने लोकांत पोलिस प्रशासनाच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त होत आहे़

नांदेड : बा-हाळी येथे महाराष्ट्र अर्बन को़ क्रेडीट सोसायटी या नावाने बोगस शाखा काढून शेतकरी, व्यापारी व कर्मचारी भरतीच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या पाच आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद होवून तब्बल तीन महिने लोटले तरी अद्याप मोकाटच असून पिडीतानांच पोलिसांकडून सबुरीचे सल्ले मिळत असल्याने लोकांत पोलिस प्रशासनाच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त होत आहे़

बा-हाळीत १६ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र अर्बन कोक़्रेडीट सोसायटीच्या नावाने बोगस शाखा सुरुवात करण्यात आली़ यात स्वयंघोषित बँक संचालक सुनील दिंडे, विभागीय व्यवस्थापक संदीप वाघमारे, कोअर कमिटी सदस्य मुबारक भांडे, लक्ष्मण गायकवाड, बा-हाळी शाखा व्यवस्थापक विजय राठोड यांचा मुख्य सहभाग होता़ या पाच जणांनी मिळून जवळपास १७ लोकांना कर्मचारी म्हणून नेमणूक केली़ यात त्यांच्याकडून लाखो रुपये गोळा केले़ त्यानंतर या कर्मचाऱ्यामार्फत एका महिन्यात ११६ बचत खाती, ८० पिग्मी खाती, १५ चालू खाती उघडण्यात आली व त्या माध्यमातून बा-हाळीतील शेतकरी, व्यापारी, कर्मचारी यांच्याकडल लाखो रुपयांवर डल्ला मारला.

या कारवाईनंतर पोलिसांनी पिडीत लोकांना त्वरित आरोपींना अटक करण्याचे आश्वासन देवून शांत केले होते़ पण तब्बल तीन महिने लोटले तरी पोलिसांना आरोपी सापडतच नाहीत़ विशेष म्हणजे उदगीर व बा-हाळी परिसरात पिडीत लोकांना वरील पाचही आरोपी तक्रार मागे घेण्यासाठी अनेकदा संपर्क करीत आहेत़ हे पोलिसांना माहीत असतानाही जाणीवपूर्वक कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाही़ विचारणा करण्यासाठी गेलेल्या पिडीत व्यक्तीलाच पोलिस सबुरीचा सल्लार देत असल्याने पोलिस प्रशासनाच्या भूमिकेविषयीच शंका येत आहे़

१७ लोकांना दिली होती नोकरीबा-हाळीत १६ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र अर्बन कोक़्रेडीट सोसायटीच्या नावाने बोगस शाखा सुरु केली़ यामध्ये  बँक संचालक सुनील दिंडे, विभागीय व्यवस्थापक संदीप वाघमारे, कोअर कमिटी सदस्य मुबारक भांडे, लक्ष्मण गायकवाड, शाखा व्यवस्थापक विजय राठोड  यांनी १७ लोकांना कर्मचारी म्हणून नेमणूक केली़  या कर्मचाऱ्यामार्फत एका महिन्यात ११६ बचत खाती, ८० पिग्मी खाती, १५ चालू खाती उघडण्यात आली व त्या माध्यमातून बाºहाळीतील शेतकरी, व्यापारी, कर्मचारी यांच्याकडल लाखो रुपयांवर डल्ला मारला़ त्यावेळी पोलिसांनी पिडीत लोकांना आरोपींना त्वरीत अटक करण्याचे आश्वासन दिले होते़ 

- आरोपींचा शोध चालू आहे़ लवकरच पकडण्यात येईल़ त्या अगोदर आम्ही पुरावे गोळा करीत आहोत़ - सुनील नाईक, सपोनि, मुक्रमाबाद़

- उदगीर व परिसरात राजरोसपणे फिरणारे आरोपी पोलिसांना भेटत नाहीत़ आमचे जवाब घेण्याच्या नावाखाली आरोपींना सुट देण्याचे काम पोलिसांकडून होत आहे - रोहीत लक्ष्मण पवार (तक्रारदार)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडPoliceपोलिस