शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सचा सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले आरोपीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:01 IST

अनेकांना लाखोंनी गंडविणारा आरोपी ट्रॅव्हल्सने पुण्याला पलायन करण्याच्या तयारीत असताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या तत्परतेमुळे लातूर पोलिसांच्या मदतीने सिनेस्टाईल पाठलाग करुन आरोपीला जेरबंद केले़

ठळक मुद्देअति. पोलिस अधीक्षक शिंदेंची तत्परता

लोकमत न्यूज नेटवर्कबा-हाळी : येथे बोगस क्रेडीट सोसायटीची शाखा उघडून अनेकांना लाखोंनी गंडविणारा आरोपी ट्रॅव्हल्सने पुण्याला पलायन करण्याच्या तयारीत असताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या तत्परतेमुळे लातूर पोलिसांच्या मदतीने सिनेस्टाईल पाठलाग करुन आरोपीला जेरबंद केले़ १२ डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली़ गेल्या चार महिन्यांपासून हा आरोपी फरार होता़बा-हाळीत १६ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र अर्बन को-सोसायटीच्या नावाने शाखा सुरु करण्यात आली होती़ बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून १७ तरुणांकडून लाखो रुपये घेवून के्रडीट सोसायटीत त्यांना कामाला लावले होते़ स्थानिक तरुण सोसायटीत असल्यामुळे अल्पावधीत परिसरातील नागरीकांचा या सोसायटीवर विश्वास बसला़ त्यानंतर व्यापारी, नोकरदार, शेतकरी, शेतमजूर यांनी मोठ्या प्रमाणात सोसायटीत रक्कम जमा केली़ परंतु पाच महिन्यातच सोसायटीने गाशा गुंडाळला़९ आॅगस्ट रोजी स्वयंघोषित बँक संचालक सुनिल दिंडे, विभागीय व्यवस्थापक संदीप वाघमारे, मुबारक भोंडे, लक्ष्मण गायकवाड, बाºहाळी शाखा व्यवस्थापक विजय राठोड या पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता़ त्यानंतर ११ आॅगस्ट रोजी सोसायटीच्या शाखेला सील ठोकण्यात आले होते़ परंतु गेल्या पाच महिन्यांपासून हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते़आरोपी सापडत नसल्यामुळे तरुणही अस्वस्थ झाले होते़ त्यांनी स्वताहाच आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती़ बा-हाळीचा शाखा व्यवस्थापक विजय राठोड हा डोंगरगाव ता़जळकोट येथील रहिवाशी असून गेल्या काही दिवसांपासून तो पुण्यात होता़ १२ डिसेंबरला साकाळे ता़शिरुर अनंतपाळ येथील सासरवाडीतून पत्नीला पुण्याला घेवून जात असल्याची माहिती तरुणांना मिळाली होती़त्या तरुणांनी गाडीचा क्रमांक, सीट क्रमांकासह माहिती मुक्रमाबाद पोलिसांना दिली होती़ परंतु मुक्रमाबाद पोलिसांनी वाहन नसल्याचे सांगत असमर्थता दर्शविली़ त्यामुळे हतबल झालेल्या तरुणांनी गुगलवरुन अतिरिक्त पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांना फोन क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधाला़ अतिरिक्त पोलिस अधीक्षक शिंदे यांची तातडीने दखल घेत मुक्रमाबाद आणि लातूर पोलिसांशी संपर्क साधला़ आरोपी हा साकोळ येथून रात्री आठ वाजता पुण्याच्या ट्रॅव्हल्समध्ये बसताच त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करीत त्याला जेरबंद केले़ माहिती मिळाल्यानंतर फक्त दीड तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या़

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसCrime Newsगुन्हेगारी